Home मनोरंजन मराठी सिनेमा दिग्दर्शित करायचा काही विचार? रोहित शेट्टी म्हणतो…

मराठी सिनेमा दिग्दर्शित करायचा काही विचार? रोहित शेट्टी म्हणतो…

0
मराठी सिनेमा दिग्दर्शित करायचा काही विचार? रोहित शेट्टी म्हणतो…

[ad_1]

० बॉलिवूडमध्ये ‘खतरों के खिलाडी’ म्हणून तुझं नाव घेतलं जातं. हा टॅग तुला आवडतो का?
– कदाचित माझ्या सिनेमांमधील अॅक्शन, स्टंट यामुळे तसंच अनेक वर्षांपासून मी ‘खतरों के खिलाडी’ हा कार्यक्रम करतोय; त्यामुळे माझ्या नावाशी हा टॅग जोडला गेला आहे. त्याचा आनंद तर मला आहेच. पण मी कोणत्याही टॅगमध्ये अडकून राहत नाही. सिनेमातील मारधाड असलेली दृश्यं मला आवडतात. मी ते लहानपणापासून बघत आलो आहे. माझे वडील मुद्दु शेट्टी अॅक्शन डिरेक्टर होते. त्यांचा वारसा मी पुढे चालवत आहे.

० दिग्दर्शक म्हणून तू नेहमी कॅमेऱ्याच्या मागे असतोस. पण, कॅमेऱ्याच्या समोर राहणं तुझ्यासाठी किती आव्हानात्मक असतं?
– मी अभिनेता नाही. मी गोष्ट सांगणारा, दाखवणारा दिग्दर्शक आहे. ज्या नजरेतून मी व्यक्त होतो; ती नजर म्हणजे कॅमेऱ्याची. त्यामुळे कॅमेरा माझा मित्रच आहे. दिग्दर्शन करताना मी कॅमऱ्याच्या मागे असतो आणि रिअॅलिटी शोमध्ये त्याच्या समोर. दोन्ही ठिकाणी मी कोणतंही पात्र साकारत नाही. त्यामुळे ते माझ्यासाठी फार आव्हानात्मक नसतं. गेली बारा वर्षं मी काही रिअॅलिटी शोच्या निमित्तानं कॅमऱ्याच्या समोर असतो. सूत्रसंचालन करताना मला माझ्यातल्या दिग्दर्शकाची मदत होते.

० तुझ्या सिनेमासाठी काम करणारी अॅक्शन टीम हे तुझं कुटुंब आहे; असं बॉलिवूडमध्ये बोललं जातं. त्याविषयी काय सांगशील?
– हे खरं आहे. माझी टीम हे माझं कुटुंब आहे. माझ्या डोक्यातले विचार प्रत्यक्षात उतरवायचं काम माझी टीम करते. टीममधील अनेक सदस्य माझ्याबरोबर १५-२० वर्षांपासून काम करताहेत. माझ्यासाठी माझी टीम खूप महत्त्वाची आहे. अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घालून ते स्टंट करत असतात. मी यशस्वी दिग्दर्शक बनण्यात त्यांचं श्रेय अधिक आहे.

० करोनाकाळात तुझी टीम तसंच इंडस्ट्रीतील आणि इंडस्ट्रीच्या बाहेरील गरजूंसाठी तू मदतीचा हात पुढे केलास. त्याविषयी…
– माझ्याकडे देण्यासारखं काही असेल तर मी ते गरजवंताला द्यायलाच हवं. करोनाकाळ सर्वांसाठीच वेदनादायी आणि हतबलतेचा होता. प्रत्येकालाच मेहनतीनं कमवायचं असतं. पण त्यावेळी सर्व उद्योग, व्यवसाय बंद होते. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. मनोरंजन इंडस्ट्रीत हजारो कामगार रोजगावर काम करतात. अशा परिस्थिती जमेल तशी आणि तितकी मदत आपण करायला हवी.

० आजवर तू अनेक मराठी कलाकारांबरोबर काम केलं आहेस; मराठी सिनेमा दिग्दर्शित करायचा काही विचार?
– मला अनेकदा सेटवर बोललं जातं की तू मराठी सिनेमाचं करतोय आणि त्यात बॉलिवूडमधील कलाकारांना घेतोयस. माझ्या सेटवर मराठमोळं वातावरण असतं. सिनेमा कोणताही असो; मराठी कलाकार माझ्या सिनेमात असतातच. त्याचं कारण आहे; अभिनयाचा दर्जा. मला मराठी सिनेमादेखील दिग्दर्शित करायला आवडेल. मी मराठी लेखकांच्या प्रेमात आहे. अनेकदा बॉलिवूडपेक्षा मराठी सिनेमांचं कथानक अधिक उजवं असतं. ‘स्कूल कॉलेज आणि लाइफ‘ या मराठी सिनेमाची मी निर्मिती केली आहे. सिनेमागृहं खुली झाल्यावर तो प्रदर्शित होईल.

[ad_2]

Source link