Home मनोरंजन मराठी सिनेसृष्टीसमोर ही समस्या आहेच; स्वप्निल जोशीनं व्यक्त केला खेद

मराठी सिनेसृष्टीसमोर ही समस्या आहेच; स्वप्निल जोशीनं व्यक्त केला खेद

0
मराठी सिनेसृष्टीसमोर ही समस्या आहेच; स्वप्निल जोशीनं व्यक्त केला खेद

[ad_1]

० करोनाचं संकट असताना सीरिजच्या टीमनं चित्रीकरण केलं; तो अनुभव कसा होता?
– आम्ही ‘समांतर २‘चं चित्रीकरण लगेचच मार्च-एप्रिलमध्ये करणार होतो. पण, करोनाचं संकट आलं आणि सगळंच ठप्प झालं. अनेक महिने काम बंद होतं. पुन्हा चित्रीकरणासाठी परवानगी मिळाली तेव्हा पहिल्यांदा विचार मनात आला तो त्या सेटवरील कर्मचाऱ्यांचा. रोजगारावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी, कलाकारांसाठी आम्ही अनलॉकमध्ये चित्रीकरण सुरु केलं. त्यांना त्यावेळी कामाची नितांत आवश्यकता होती. सेटवर प्रत्येक जण करोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करुन काम करत होता. त्यावेळी त्यांच्या मनात करोनाची भीती तर होतीच शिवाय कुटुंबाची काळजी जास्त वाटत होती. म्हणूनच तासनतास पीपीई किटमध्ये राहून सर्व जण काम करत होते.

० ‘समांतर २’चा दिग्दर्शक बदलला. तुला याबद्दल काय वाटतं?
– प्रत्येक दिग्दर्शकाची काम करण्याची पद्धत, शैली वेगळी असते. म्हणूनच सतीश आणि समीर या दोघांचे सिनेमे दिसायला वेगळे असतात. पण, आता एकाच चौकटीतील पूर्वार्धाची कथा प्रेक्षकांनी सतीशच्या नजरेतून पाहिली आहे. आता त्यापुढील कथा प्रेक्षक समीरच्या नजरेतून पाहणार आहेत. कदाचित दिग्दर्शकीय मांडणी दोघांची वेगळी असेल; पण ती कथा पडद्यावर मांडताना दोघांनी संपूर्ण न्याय दिला आहे.
या प्रवासात मी समाधानी आहे पण आणि नाही पण: आरोह वेलणकर
० वैविध्यपूर्ण कलाकृतींच्या निमित्तानं तू वर्षभर प्रेक्षकांना भेटलास. हे वर्ष तुझ्यासाठी कसं होतं?
– एक कलाकार म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्यासाठी सर्व प्रेक्षकांचे आभार. जो काळ अनेकांसाठी कामाच्या बाबतीत कष्टदायी होता; त्या काळात माझ्याकडे काम होतं. यासाठी मी त्या प्रत्येकाचा ऋणी आहे. त्यांच्यामुळेच मी प्रेक्षकांच्या नजरेत राहू शकलो.


० गेल्या वर्षभरात अनेक हिंदी, दाक्षिणात्य सिनेमे ओटीटीवर लागले. पण, मराठी सिनेमांचं फारसं तसं काही झालं नाही; असं का ?
– याला अनेक घटक कारणीभूत आहेत. सिनेमांचा दर्जा काय?, प्रेक्षक ते सिनेमे बघतात का?, माध्यमांमध्ये त्याची तितकी चर्चा आहे का? या सगळ्याचं एका वाक्यात उत्तर देणं थोडं अवघड आहे. कारण, जागतिक पातळीवर गाजलेले असे अनेक मराठी सिनेमे आहेत. पण, मराठी प्रेक्षक ते पाहण्यासाठी उत्सुक नाहीत. मराठी सिनेसृष्टीसमोर ही समस्या आहेच. त्यामुळे इंडस्ट्रीतील सर्व स्तरातील मंडळींनी एकत्र येऊन याचं ठोस आणि परिणामकारक उत्तर शोधायला हवं.

माझ्या स्वप्नापेक्षाही मला बरंच काही मिळालंय: मनोज वाजपेयी
० कठीण काळात गरजूंना मदत केलेल्या अनेक कलाकारांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. याबद्दल तुझं मत काय?
– सगळ्यांची तोंड आपण बंद करू शकत नाही आणि तसं करुही नये. त्यांना त्यांचं मत मांडण्याचा, बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण, मी त्यांना सांगू इच्छितो की, मी किंवा इतर कोणत्या कलाकाराने इतकीच मदत केली म्हणून तुम्ही नाराज आहात का? तर आमच्यापेक्षा अधिक मदत तुम्ही करा. त्याचा मला अधिक आनंद होईल.
जंगल आपल्याला स्वतःची पातळी दाखवतं…विद्या बालननं शेअर केला शूटिंगचा अनुभव



[ad_2]

Source link