हायलाइट्स:
- संजय दत्तचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
- सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमुळे संजयवर याआधीही झाली आहे टीका
- व्हायरल व्हिडीओमध्ये संजयनं दिलं आहे पुरुषत्त्वावर भाषण
संजय दत्तनं या व्हिडीओमध्ये जे पुरुष जीममध्ये न जाता आपला वेळ सलूनमध्ये घालवतात अशांवर एक लांबलकच मोनोलॉग म्हटला आहे. हा व्हिडीओ ‘हॅवार्ड ५००’च्या जाहिरातीचा भाग आहे. जो २००८ मध्ये पहिल्यांदा समोर आला होता. या व्हिडीओमध्ये संजय दत्त, छातीवरील केसांचं वॅक्स करणाऱ्या आणि गुलाबी शर्ट घालून फिरणाऱ्या मेट्रो सेक्शुअल लोकांची खिल्ली उडवताना दिसत आहे.
संजय दत्तनं आपल्या व्हिडीओमध्ये या सर्व गोष्टी पुरुषांच्या नाही तर मुलींच्या आहेत असं म्हटलं आहे. तो पुढे म्हणतो, ‘पुरुषांनी दाढी वाढवायला हवी. मळकट जीन्स घालायला हवी आणि सालसा डान्स शिकणं सोडून भांगडा डान्स करायला हवा.’ संजयला या त्याच्या व्हिडीओमुळे बरीच टीका सहन करावी लागली आहे. आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
संजय दत्तच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा ‘कलंक’ या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत दिसला होता. ज्यात अभिनेत्री आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता वरुण धवन, आदित्य राय कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. तसेच लॉकडाऊनमध्ये त्याचे ‘तोरबाज’ आणि ‘सड़क २’ हे चित्रपट ओटीटीवर रिलीज झाले होते. आगामी काळात संजय दत्त ‘केजीएफ: चॅप्टर २’ आणि ‘शमशेरा’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.