Home मनोरंजन मला हे पटतंच नाही; तपास का थांबलाय? सुशांत आत्महत्या प्रकरणी उषा नाडकर्णींचा सवाल

मला हे पटतंच नाही; तपास का थांबलाय? सुशांत आत्महत्या प्रकरणी उषा नाडकर्णींचा सवाल

0
मला हे पटतंच नाही; तपास का थांबलाय?  सुशांत आत्महत्या प्रकरणी उषा नाडकर्णींचा सवाल

[ad_1]

हायलाइट्स:

  • वर्षभरापूर्वी सुशांतनं केली होती आत्महत्या
  • सुशांतच्या मृत्यूने उषा नाडकर्णी यांना बसला होता धक्का
  • इतका महत्वकांक्षी मुलगा आत्महत्या करू शकत नाही- उषा नाडकर्णी

मुंबई– बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूने संपूर्ण बॉलिवूड हादरलं. सुशांतचे चाहते आजही त्याच्या जाण्याचं दुःख पचवू शकलेले नाहीत. सुशांतचा मृत्यू नक्की कोणत्या कारणांमुळे झाला, याबद्दल अजूनही तपास सुरू आहे. इतरांप्रमाणे जेष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनादेखील सुशांतच्या जाण्याचा धक्का बसला होता. सुशांतला जाऊन आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उषा यांनी सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, असं म्हणत त्याच्या मृत्यूसंदर्भातील तपास अजून पूर्ण का झाला नाही असा प्रश्न विचारला आहे.

बोलणं टोचलं! आता हर्षवर्धन कपूरवर नाराज झाली कतरिना कैफ?

बॉलिवूडमध्ये कोणाचाही पाठिंबा नसताना केलं नाव
सुशांत आणि उषा यांनी छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केलं होतं. उषा यांनी सुशांतच्या आईची भूमिका साकारली होती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखतीत उषा यांनी सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला. सुशांतबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, सुशांतच्या जाण्याची बातमी मला माझ्या मेकअप आर्टिस्टकडून समजली. मी तिला म्हटलं नाही गं तो आपला सुशांत नसेल. तर ती म्हणाली नाही आपलाच सुशांत आहे. खूप वाईट वाटलं त्या मुलाच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती. त्याने बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. त्याला चित्रपटही चांगले ऑफर होत होते. त्याने मला म्हटलं होतं की, आई मी बीकेसीला दोन कोटींचा फ्लॅट घेणार आहे. त्याला दिग्दर्शन शिकायला परदेशी जायचं होतं. मला त्याचा प्रचंड अभिमान होता.’

AssignmentImage-721927319-1623567210

तो आत्महत्या करू शकत नाही
सुशांतच्या आत्महत्येबद्दल बोलताना उषा म्हणाल्या, ‘इतका महत्वकांक्षी मुलगा अचानक आत्महत्या कसा करेल? मला हे पटलंच नाही की त्याने आत्महत्या केली. काहीतरी वेगळंच झालंय जे सगळ्यांपासून लपवून ठेवलं गेलंय. मी कधीही मान्य करणार नाही की त्याने आत्महत्या केली. त्याला इण्डस्ट्रीमधून खूप त्रास देण्यात येत होता असं मी वाचलंय. त्याने ३२ सिम कार्ड बदलले. मग त्याच्या मृत्यूमागचं कारण अजूनही पोलीस का शोधू शकलेले नाहीत? त्याच्या फोटोंवरून त्याला मारहाण झाल्याचं देखील समोर आलं होतं. मग तपास त्या दिशेने का सुरू नाहीये? मी म्हणत नाही मला सगळं माहितीये. मीदेखील तुमच्यासारखी वर्तमानपत्र वाचते. पण मी सुशांतला जवळून पाहिलंय. तो असं काही करणारा मुलगा नव्हता.’

काही नाती आयुष्यभरासाठी बांधली जातात; खास व्यक्तीसाी मिलिंद गवळीनं शेअर केली भावुक पोस्ट

[ad_2]

Source link