नवी दिल्लीः ओप्पो कंपनीचा A5s या स्मार्टफोनच्या किंमतीत आणखी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या टॉप फोनची किंमत वर्षाच्या सुरुवातीला कमी करण्यात आली होती. परंतु, ती आता पुन्हा एकदा कमी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ओप्पोच्या ग्राहकांना हा फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
ओप्पो A5s च्या स्मार्टफोनची किंमत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे ३ जीबी रॅम असलेल्या या फोनची किंमत आता ८ हजार ९९० रुपये इतकी झाली आहे, अशी माहिती मुंबईतील मोबाइल विक्रेता महेश टेलिकॉम यांनी दिली आहे. या फोनची किंमत आधी १३ हजार ९९० रुपये इतकी होती. त्यानंतर त्याची किंमत कमी करण्यात आली होती. आता पुन्हा या स्मार्टफोनची किंमत कमी करण्यात आल्याने हा फोन अवघ्य नऊ हजारात खरेदी करता येणार आहे. हा फोन अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवरून खरेदी करता येऊ शकतो. या वर्षाच्या सुरुवातीला ओप्पो A5s च्या टॉप मॉडेल (४ जीबी प्लस ६४ जीबी) ची किंमत कमी करण्यात आली होती. त्याची किंमत १५ हजार ९०० रुपये इतकी होती. त्यानंतर किंमत कमी करून ११ हजार ९९० रुपये इतकी फोनची किंमत करण्यात आली होती.
या फोनमध्ये ६.२ इंचाचा एचडी (१५२०X७२० पिक्सल) एलसीडी डिस्प्ले आहे. २.३ जीएचझेड ऑक्टा-कोर १२ एनएम मेडियाटेक हेलियो पी ३५ प्रोसेसर आहे. ६४ जीबी इंटरनल मेमरी आहे. कार्डच्या मदतीने ती वाढवता येऊ शकता येते. फोटोसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा व २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. ४ हजार २३० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.