Home बातम्या ऐतिहासिक महाऊर्जा अंतर्गत सौरऊर्जा उपकरणाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

महाऊर्जा अंतर्गत सौरऊर्जा उपकरणाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

0
महाऊर्जा अंतर्गत सौरऊर्जा उपकरणाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर, दि. 04 : महाऊर्जा अंतर्गत नागपूरातील 230 विविध ठिकाणी सौर ऊर्जा उपकरणाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने उत्तर नागपूरातील  माता वेलंकनी चर्च, मार्टीन नगर, जरीपटका, बंदे नवाज नगर, नवीन वस्ती टेका, बुनकर कॉलनी, अशोक नगर या चार ठिकाणी सौर उर्जा उपकरणाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

नैसर्गिक संसाधनाच्या कमतरतेमुळे विद्युत निर्मीतीत घट होत असून त्यामुळे विजेचा अपूरा पुरवठा होत आहे. यावर उपाय म्हणून सौर ऊर्जा ही काळाची गरज ठरली आहे, असे पालकमंत्री यांनी  यावेळी सांगितले.

यावेळी रेखा सुर्यवंशी, शौकत अली, इमरान खान, शब्बीर अहमद तसेच  नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.