महाटेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड आणि यंत्रसामग्रींना भांडवली अनुदान देण्यासाठी समिती गठित

महाटेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड आणि यंत्रसामग्रींना भांडवली अनुदान देण्यासाठी समिती गठित
- Advertisement -

मुंबई, दि. 29 : एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात आले आहे. महाटेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड योजनेअंतर्गत महा(Maha-TUFS)  यंत्रसामग्री तसेच इतर सामग्रींना भांडवली अनुदानाचा लाभ देण्यासाठी  यंत्रसामग्री निश्चित करण्यासाठी वस्त्रोद्योग आयुक्त, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय 28 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

या समितीमध्ये सदस्य सचिव सहआयुक्त (तांत्रिक) वस्त्रोद्योगआयुक्तालय, नागपूर असून केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्तालयांचे प्रतिनिधी, द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मुंबई प्रतिनिधी,  वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेचे प्रतिनिधी, द सिंथेटिक ॲण्ड आर्ट सिल्क मिल्स रिसर्च असोसिएशन संस्थेची प्रतिनिधी, दत्ताजीराव कदम तंत्रज्ञान शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी, बॉम्बे टेक्सटाईल रिसर्च असोसिएशन संस्थेचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्यादित, मुंबईचे प्रतिनिधी यांची  सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या समितीची कार्यकक्षा अशी राहील :-

A-TUFS  व RR-TUFS अंतर्गत केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या यंत्रसामग्रींच्या यादीमधील यंत्रसामग्रींचा अभ्यास करुन सदर यंत्रसामुग्री महा टेक्नोलॉजी अपग्रेडेशन फंड योजनेतंर्गत (Maha-TUFS) तसेच इतर यंत्रसामग्रींना भांडवली अनुदानाचा लाभ देण्यासाठी पात्र यंत्रसामग्री अधिसूचित करण्यासाठी शासनास शिफारस करणे, केंद्र शासनाने A-TUFS व RR-TUFS अंतर्गत अधिसूचित केलेल्या यंत्रसामग्रींच्या यादीमध्ये समावेशित नसलेली परंतु यापूर्वी स्थापित असलेल्या (existing machinery) यंत्रसामग्रींचा अभ्यास करुन ही यंत्रसामुग्री महाटेक्नोलॉजी अपग्रेडेशन फंड योजनेतंर्गत (Maha-TUFS) तसेच इतर यंत्रसामग्रींना भांडवली अनुदानाचा लाभ देण्यासाठी पात्र यंत्रसामग्री अधिसूचित करण्यासाठी शासनास शिफारस करणे.

वस्त्रोद्योगाकरीता वेळोवेळी निर्मित होणारी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक यंत्रसामग्री निश्चित करून सदर यंत्रसामग्री महाटेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड योजनेंतर्गत (Maha-TUFS) तसेच इतर यंत्रसामुग्रींना भांडवली अनुदानाचा लाभ देण्यासाठी पात्र यंत्रसामुग्री अधिसूचित करण्यासाठी शासनास शिफारस करणे. विद्यमान वस्त्रोद्योग प्रकल्पांचे आधुनिकीकरण करताना धोरणाच्या शासन निर्णयात नमूद सर्व निकष तपासून प्राप्त प्रस्तावांचा प्रकल्प अहवाल (DPR) तपासून अंतिम मंजुरीसाठी शासनास शिफारस करणे, प्रत्येक वर्षी महाटेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड योजनेतंर्गत (Maha-TUFS) तसेच इतर यंत्रसामग्रींची यादी सुधारीत करून सदर यादी अंतिम करून Maha-TUFS अंतर्गत अधिसूचित करण्यासाठी शासनास शिफारस करणे. वस्त्रोद्योग घटकांना त्यांच्या प्रकल्पामध्ये लॅब मशीन वा इतर प्रायोगिक तत्वावरील यंत्रसामग्री स्थापित करण्यासाठी शिफारस करणे. या समितीची बैठक प्रत्येक महिन्यात किंवा आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येणार आहे.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

- Advertisement -