Home शैक्षणिक महात्मा फुले पुण्यतिथी उत्साहात साजरी – सातारा

महात्मा फुले पुण्यतिथी उत्साहात साजरी – सातारा

0

सातारा-( डॉ विनोद खाडे)
महाराष्ट्राचे थोर समाजसेवक महात्मा जोतिबा फुले यांची 129 वी पुण्यतिथी फुले यांचे मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती खटाव यांचे संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत
प्राथमिक शिक्षण अधिकारी प्रभावती कोळेकर, आमदार महेश शिंदे यांच्या सुविद्य पत्नी प्रिया शिंदे ,मुख्य लेखाधिकारी धर्मेंद्र काळोखे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी
अविनाश फडतरे, मनोज जाधव,माजी सभापती संदीप मांडवे, आनंदराव भोंडवे आदींची उपस्थिती होती
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले यांच्या भव्य पुतळ्याला अभिवादन व पुष्पवृष्टी करून सभामंडप बांधणे कामी जागेचे भूमीपूजन करण्यात आले.यानंतर विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले, यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी,”फुले दाम्पत्याने दिलेली स्त्री पुरुष समानतेची शिकवण अजूनही खऱ्या अर्थाने समाजात रुजवली जात नाही” तर शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी ” आजही समाजात मुलींचा जन्मदर कमी आहे,जर मुलींना योग्य मार्गदर्शन मिळाले तर
समाजात निश्चितच नावलौकिक वाढवतील असं सांगितले
कराड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य
हणमंतराव कराळे आपल्या व्याख्यानात”मुलीला कधी परक्याचं धन समजू नका,तर वंशाचा दिवा म्हणून पालन करा,हीच खरी फुले दाम्पत्याला श्रद्धांजली असल्याचं”
म्हणाले.दरम्यान ग्रामस्थांचे वतीने,” या ठिकाणी शिल्प वृष्टी व्हावी,महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना’भारत रत्न’ पुरस्कार मिळावा, पर्यटनाचा ‘अ’वर्ग दर्जा मिळावा
आदी मागण्या करण्यात आल्या. शेवटी अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी”फुले दाम्पत्याने केलेलं समाज कार्य अविस्मरणीय असून,ग्रामस्थांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर विशेष पाठपुरावा करणार असल्याचे ठामपणे सांगितले
गटविकास अधिकारी रमेश काळे,गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते