Home अश्रेणीबद्ध महापालिका आयुक्तांनी साधला इस्रालयच्या विद्यार्थ्यांशी संवाद

महापालिका आयुक्तांनी साधला इस्रालयच्या विद्यार्थ्यांशी संवाद

0

इस्रालयच्या वाणिज्यदुतावासांची उपस्थितीविकास प्रकल्पांचे केले कौतुक

ठाणे(23)इस्रायलस्थित आयडीसी हर्जलिया विद्यापीठाच्या तसेच मुंबईतील नामांकित आर्किटेक्चर इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या जवळपास 30 विद्यार्थ्यांशी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मुक्त संवाद साधून ठाणे शहरामध्ये राबविण्यात येणा-या महत्वाकांक्षी प्रकल्पांची त्याचबरोबर पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी इस्रायलयचे वाणिज्यदूत एच. ई. याकूव्हफ्रँक्नस्टीन यांनी या चर्चेत सहभागी होवून ठाणे शहराने राबविलेल्या प्रकल्पांचे कौतुक करून इस्रालय सरकार ठाणे महानगरपालिकेला सर्वतोपरी सहकार्य करील अशी ग्वाही दिली.

     ऑब्जर्व्हर रिसर्च फौंडेशनच्या वतीने इस्रायलच्या आडीयसीहर्जलिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी नगरनियोजन या विषयावर चार दिवसाची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत इस्रालयचे 15 विद्यार्थी त्याचप्रमाणे मुंबईतील विविध प्रतिथयश आर्किटेक्चर इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे 15 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातीस विद्यार्थ्यांनी आज नागरी संशोधन केंद्र ठाणे येथे इस्रायलचे वाणिज्यदूत आणि निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी डॅा. रामनाथ झा यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी मुक्तसंवाद साधला.

     या मध्ये प्रामुख्याने नागरी विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा अनेक विषयांवर मनमोकळी चर्चा झाली. यावेळी श्री. जयस्वाल यांनी स्मार्ट शहराची व्याख्याही प्रत्येक शहराची पार्श्वभूमी काय आहे त्यावर अवलंबून आहे असे सांगितले.

     श्री.जयस्वाल यांनी यावेळी ठाणे शहराच्या विकासाबाबत बोलताना सांगितले की, मुंबईच्या तुलनेत डॅारमेटरी शहर अशी ओळख असलेल्या या शहराची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची आवश्यकता होती. त्यासाठी मुलभूत पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच दळणवळण, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात महत्वाकांक्षी प्रकल्प राबवून शहराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर ओळख प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला असे सांगितले.

     आज मुंबईतून स्थलांतरित होणा-यांपैकी 80 टक्के लोक ठाणे शहरामध्ये स्थायिक होतात ही वास्तविकता असल्याचेसांगितले. त्याचबरोबर लोकशाहीमध्ये आजच्या घडीला नागरिकांना अभिप्रेत असलेल्या विकासांच्या संकल्पनांची अंमलबजावणी करणे अभिप्रेत असल्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी ठाणे शहराचा बदलता चेहरायावर आधारीत राबविलेल्या अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांचे सादरीकरूण केले.

     इस्रायलचे वाणिज्य दूत एच. ई. या कूव्हफ्रँक्नस्टीन यांनी ठाणे शहराच्या विकास ज्या पद्धतीने होत आहे त्याबद्दल ठाणे महापालिकेचे आणि महापालिका आयुक्तांचे कौतुक केले. नागरी विकासामध्ये स्मार्ट नियोजन, नेतृत्व, नागरिकांचा सहभाग आदी गोष्टींना महत्व असून श्री.जयस्वाल यांनी त्या दिशेने काम केल्यामुळेच ठाणे शहराचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी इस्रायल सरकार ठाणे महानगरपालिकेस पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

     प्रारंभी श्री.जयस्वाल यांनी इस्रायलचे वाणिज्यदूत एच.ई. या कूव्हफ्रँक्नस्टीन यांचे तसेच माजी सनदी अधिकारी डॅा. रामनाथ झा यांचे स्वागत केल्यानंतर अतिरिक्तआुक्त(2) आणि ठाणे स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांनी स्मार्टसिटी प्रकल्पांचे सादरीकरणकेले. यावेळी नागरी समुह विकास प्रकल्प तसेच इतर महत्वाच्या प्रकल्पांचे सादरीकरणही करण्यात आले.

     यावेळी ठाणेकर असलेल्या प्रतिक शिरोडकर आणि त्यांच्या सहका-यांनी बनविलेल्या अस्सल भारतीय रोबोटेकचे प्रात्यक्षिक दाखविले. या संवादानंतर या सर्व विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या विविध प्रकल्पाला भेटी दिल्या.