Home शहरे मुंबई महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही, निघालेत स्मार्ट सिटी करायला

महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही, निघालेत स्मार्ट सिटी करायला

सत्ताधाऱ्यांवर अजित पवार संतापले

मुंबई : काल (सोमवार) सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण मुंबई जलमय झाली आहे. यामुळे महानगरीतील वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये 2, 4 आणि 5 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मात्र, जोरदार पावसामुळे मुंबईत जागोजागी पाणी तुंबले आहे. त्यामळे नागरिकांनी मुंबई महापालिकेला दोष द्यायला सुरुवात केली आहे. तसेच, विरोधक देखील आक्रमक झाले असून सत्ताधारी पक्षावर टीका करत आहे. मुंबईच्या या परिस्थितीवर राष्ट्रवादीचे नेते ‘अजित पवार’ यांनी सुद्धा ट्विटर अकाऊंटवरून टीका केली आहे. ‘जे आहे ते सांभाळता येत नसलेले स्मार्ट सिटी करायला निघालेत! महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही. हा सत्तेचा माज आहे’. असं अजित पवार म्हणाले आहे.