Home शहरे मुंबई महापौर मिनाक्षी शिंदे यांनी अधिकाऱयांसमवेत केली मॉरेथॉन स्पर्धा मार्गाची पाहणी

महापौर मिनाक्षी शिंदे यांनी अधिकाऱयांसमवेत केली मॉरेथॉन स्पर्धा मार्गाची पाहणी

ठाणे: 30 व्या ठाणे महापौर वर्षा मॉरेथॉनच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर आज (22 जुलै) महापौर मिनाक्षी शिंदे यांनी अधिकाऱयांसमवेतमॉरेथॉनसाठी निश्चित केलेल्या स्पर्धा मार्गाचा पाहणी दौरा केला. या पाहणीदौऱयात स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेशम्हस्के, नगरसेवक नरेश मणेरा, नगरअभियंता रविंद्र खडताळे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, क्रीडाअधिकारी मीनल पालांडे, उपअभियंताशैलेश चारी यांच्यासह तांत्रिक समितीचे सदस्य उपस्थित होते.

    रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा ऑथलेटिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने 30 वी ठाणे महापौर वर्षामॉरेथॉन 2019 घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या स्पर्धेत दरवर्षी हजारोंच्या संख्येने स्पर्धक सहभागी होत असतात. या अनुषंगाने स्पर्धामार्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी अधिकाऱयांसमवेत पाहणी दौरा केला. सदर पाहणीदौऱयादरम्यान 21कि.मी स्पर्धा मार्गाची पाहणी करण्यात आली. सदर पाहणीदौऱयामध्ये स्पर्धेसाठी निश्चित केलेला मार्ग सुस्थितीत असल्याची माहिती महापौरयांनी यावेळी दिली. काही किरकोळ कामे करणे आवश्यक असून आवश्यक ती कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधितविभागांना यावेळी देण्यात आल्या.

    स्पर्धेच्या दिवशी स्पर्धा मार्गाच्या दुतर्फा अनधिकृतपणे उभी असलेली वाहने हटविण्याबाबत संबंधित विभागाना सूचना देण्यात आल्या.