महापौर राहुल जाधव यांचं ठरलं ;जलपूजनानंतर होणार शहराला दररोज पाणीपुरवठा

- Advertisement -

पिंपरी: पिंपरी चिंचवड पाणी कपात रद्द करून दररोज नियमित पाणी पुरवठा करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी कपात रद्द करण्यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी गटनेत्यांची बैठक घेऊन यावर चर्चा केली. बुधवार (दि. 7) पासून नागरिकांवरील पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात मोठा पाणीसाठा उपलब्ध आहे. 20 हजारहून अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तरी आज देखील धरण क्षेत्रासह शहरावर धो-धो पावसाची बरसात सुरू आहे.

त्यातच सामाजिक कार्यकर्त्यांपासून ते खासदार, आमदारांपर्यंत शहराला नियमित पाणी पुरवठ्याची मागणी होत आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सर्वपक्षीय गटनेत्यांची महापालिकेत बैठक घेतली. यावेळी महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते पवना धरणातील जलाशयाचे पूजन करण्यात येणार आहे.

त्यानंतर बुधवारपासून शहराला नियमित पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांवरील पाणी कपात बुधवापरपासून रद्द केली जाणार आहे. या बैठकीला महापौर राहूल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ आदी उपस्थित होतेपिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पिंपरी पालिका आयुक्त कार्यालयात आज सांयकाळी 4 वाजता बैठक घेण्यात आली.

या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर,महापौर राहुल जाधव,विरोधी पक्षनेते नाना काटे,मनसे पक्षनेते सचिन चिखले,शिवसेना गटनेते राहुल कलाटे इत्यादी नगरसेवक उपस्थित होते.बैठकीबाबत बोलताना महापौर राहुल जाधव म्हणाले की येत्या बुधवारी जलपूजन करण्यात येणार असून त्यानंतर 7 तारखेपासून पिंपरी चिंचवडचा पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.

- Advertisement -