मुंबई, दि. ३१ : महाप्रित कंपनीने इंडो ब्रिटीश बिझनेस फोरम (IBBF) यांच्याबरोबर नुकताच सामंजस्य करार केला. याप्रसंगी ‘महाप्रित’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपीन श्रीमाळी, इंडो ब्रिटीश बिझनेस फोरमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कविता शर्मा व महाप्रितचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या कराराद्वारे महाप्रितच्या अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प, पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत व संवर्धन, कृषी प्रक्रिया, रस्ते प्रकल्प, हायड्रोजन प्रकल्प, उदयोन्मुख तंत्रज्ञान प्रकल्प आणि सर्वांगीण विकास प्रकल्पांना इंडो ब्रिटीश बिझनेस फोरमचे आर्थिक आणि धोरणात्मक सहकार्य मिळेल.
तसेच ब्रिटीश सरकारद्वारेसुद्धा आर्थिक सहाय्य तसेच आवश्यक संसाधने पुरविण्यात येतील.
**
- Advertisement -