हायलाइट्स:
- सुशांतच्या मृत्यूनंतर रियावर झाले होते आरोप
- बॉलिवूडमध्ये काम मिळणं देखील झालं होतं कठीण
- द्रौपदीच्या भूमिकेतून करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक
‘अजूनही बरसात आहे’ मधून मुक्ता- उमेश घेऊन येत आहेत नवी कथा
नुकतंच रियाने ‘द टाइम्स ५० मोस्ट डिजायरेबल वूमन २०२०’ या यादीत पहिलं स्थान मिळवलं होतं. आता रियाला एका नवीन चित्रपटाची ऑफर मिळाल्याची बातमी समोर येतेय. हा चित्रपट प्राचीन ग्रंथ असलेल्या महाभारतावर आधारित असणार आहे. चित्रपट बिग बजेट असून या चित्रपटात रियाला द्रौपदीच्या पात्रासाठी विचारणा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
चित्रपटात महाभारत आणि द्रौपदीला एका अनोख्या पद्धतीने दाखवलं जाणार आहे. चित्रपटाची कथा आधुनिक जगाला ध्यानात ठेवून तयार करण्यात आली आहे. चित्रपटात असं काही दाखवण्यात येणार आहे जे यापूर्वी कधीही दाखवलं गेलं नाही. रिया सध्या या ऑफरबद्दल विचार करत असून तिचं चित्रपटावर जुजबी बोलणं झालं आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर रियाला अनेक आरोपांचा सामना करावा लागला होता. तिचं बॉलिवूडमधील करिअर जवळपास संपुष्टात आलं होतं. रियाला चित्रपट मिळत नव्हते. रिया हळूहळू आपल्या पूर्वीच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या रिया बॉलिवूडमधील दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडे काम मागत आहे, जेणेकरून ती तिच्या पूर्वीच्या आठवणींतून बाहेर पडू शकेल. रिया लवकरच अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांच्या ‘चेहरे’ चित्रपटात झळकणार आहे.
तिने माझ्याकडे चंद्र – तारे देखील मागितले असते…आईच्या निधनानंतर बोमन ईराणी यांची भावुक पोस्ट