Home गुन्हा ‘‘महामार्गावर दरोडा टाकून लुटणारी परप्रांतीय आंतरराज्य टोळी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणकडून चित्तथरारक पाठलाग करून जेरबंद- स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई’’

‘‘महामार्गावर दरोडा टाकून लुटणारी परप्रांतीय आंतरराज्य टोळी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणकडून चित्तथरारक पाठलाग करून जेरबंद- स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई’’

पुणे:- प्रतिनिधी

‘‘महामार्गावर दरोडा टाकून लुटणारी परपं्रातीय आंतरराज्य टोळी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणकडून चित्तथरारक पाठलाग करून जेरबंद- स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई’’


यवत पोेलीस स्टेषन, पुणे ग्रामीण हद्दीत कंटेनर हायजॅक करून मेडीसीन लुटलेबाबत गुन्हा दाखल होता सदर गुन्हयाचा मा. पोलीस अधीक्षक साो., पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक श्री. मिलींद मोहीते, बारामती विभाग यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट, सहा. पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय गुंड, पोलीस उप निरीक्षक श्री. अमोल गोरे, सहा.फौज. दत्तात्रय गिरीमकर, दयानंद लिमण, पो.ना.राजू मोमीन, जनार्दन शेळके, पो.हवा.महेष गायकवाड, उमाकांत कुंजीर, मुकुंद अयाचित, मोरेष्वर इनामदार, राजेंद्र पुणेकर, अनिल काळे, रविराज कोकरे, पो.ना.विजय कांचन, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, गुरू जाधव, रौफ इनामदार, पो.काॅ.धिरज जाधव, पो.ना.प्रमोद नवले, चा.पो.हवा.सावंत, अक्षय जावळे यांचे पथकामार्फत समांतर तपास चालु होता. नमुद तपासादरम्यान स्था.गु.शा.पथकाने आरोपी निष्पन्न करून मध्यप्रदेषातील देवास,इंदोर या भागात जाऊन त्यांची इत्यंभुत माहीती गोळा केली होती. त्यात संशयीत आरोपींचे फोटो हस्तगत केले होते.
दि. 24/06/2020 रोजी उषीरा स्थानिक गुन्हे शाखेतील वर नमुद अधिकारी व कर्मचारी यांचे पथक पेट्रोलींग करीत असताना त्यांना निष्पन्न केलेल्या आरोपीपैकी एक आरोपी हा एका ट्रकमधून चैफुला बाजूकडून षिरूर बाजूकडे पास होताना दिसला त्याचे मागील बाजूस नंबरप्लेट नव्हती त्यामुळे संशय बळावल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रकचा चित्तथरारक पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू असताना ट्रक या अहमदनगर बाजूकडे भरधाव वेगाने जात असल्याचे दिसताच स्था.गु.शा.पथकाने मदतीकरीता षिरूर पोलीस स्टेषनचे पो.नि.श्री.प्रविण खानापुरे, स.पो.नि.काबुगडे, पो.काॅ.जितेंद्र मांडगे, सुदाम खोडदे, कल्पेष राखुंडे यांचे पथकास बोलावून सतराकमान पुल, षिरूर येथे नाकाबंदी करून ट्राफीक जॅम करून थांबविली.
सदरची दोन्ही वाहने ट्राफीक जॅममध्ये अडकल्यानंतर एका ट्रकमधील आरोपी उडी मारून पळून गेले व दुसÚया ट्रकमधील आरोपीने ट्रकने संरक्षक कठडा तोडून पळून जाऊ लागले त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा एका पथकाने थांबलेला 1 ट्रक ताब्यात घेतला व पळून जाणारे दुसÚया ट्रकचा पाठलाग सुरू केला त्यातीलही आरोपी ट्रक सोडून शेजारील ऊसात पळून गेले, थांबलेले दोन्ही ट्रक स्था.गु.शा.पथकाने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या टाटा कंपनीच्या 3118 माॅडेलच्या दोन ट्रकमधून रांजणगाव एम.आय.डी.सी. येथील आय.टी.सी.कंपनीचा सिगारेट भरलेले रू. 4,51,58,400/- किंमतीचे 588 बाॅक्स हस्तगत केले आहे. पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेकडून पथके रवाना केली होती. परंतु रात्री अंधार झाल्याने व आरोपींकडे हत्यार असण्याची शक्यता असल्याने आरोपी लपलेल्या भागावर देखरेख ठेवून उजेड झाल्यानंतर पोलीस मित्राचे मदतीने सकाळी 11.00 वाजेपर्यंत एकुण 7 आरोपींना षिताफीने ऊसाचे शेतातून ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे 1) दिनेश वासुदेव झाला वय 50 वर्षे रा. टांेक कला, तालुका टोंक खुर्द, जि. देवास, 2) सुशील राजेंद्र झाला, रा. टोंककला, ता. टोंक खुर्द, जि. देवास , 3) मनोज केशरसिंग गुडेन, रा.ओढगाव, ता. सोनकछ, जि. देवास, 4) मनोज उर्फ गंजा राजाराम सिसोदिया, रा. भैरव खेडी जि. देवास, 5) ओमप्रकाश कृष्णा झाला, रा. भैरव खेडी ता. टोंक खुर्द, जि.देवास, 6) कल्याण सदुल चैहान, रा ओढ, तालुका सोनकछ, जिल्हा देवास, 7) सतिष आंतरसिंग झांजा, रा.ओडगाव, ता.सोनकछ,जिल्हा देवास, राज्य मध्यप्रदेश अषी आहेत
संपुर्ण कारवाईदरम्यान रू.4,51,58,400/- किंमतीचे सिगारेट, रू. 13,600/- रोख रक्कम, 6 मोबाईल फोन, 2 ट्रक, 1 बनावट रिव्हाॅल्व्हर, डुप्लीकेट नंबर प्लेटचे अंक व नंबर, एक चाॅपर, एक चाकु असा किंमत रू. 4,91,79,500/- माल हस्तगत केला आहे. पकडलेल्या इसमांकडे केलेल्या चैकषीमध्ये त्यंानी सिगारेटचा माल हा सुपे ते मोरगाव रोडवरून सिगारेटने भरलेला कंटेनर हायजॅक करून दरोडा टाकून लुटून आणल्याची माहीती दिलेली आहे. सदर घडनेमध्ये आरोपींनी कंटेनर हायजॅक केल्यानंतर कंटेनरमधील ड्रायव्हरला रिव्हाॅल्व्हरसारख्या दिसणाÚया वस्तुचा धाक दाखवून त्यांचेकडील एका ट्रकमधून पळवून नेऊन टेंभुर्णी येथे सोडून दिले होते त्याने घडलेल्या घटनेबाबत दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पो.स्टे. येथे गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा तपास स.पो.नि.श्री. सेामनाथ लांडे, वडगाव निंबाळकर पो.स्टे. हे करीत आहेत.
ताब्यात घेतलेले इसम हे आंतरराज्य टोळीतील कुख्यात व सराईत गुन्हेगार असून त्यांनी यापुर्वी पुणे ग्रामीण हद्दीतील षिक्रापूर पो.स्टे.,यवत पो.स्टे. हद्दीत गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे परंतु सदर टोळीतील आरोपी हे कुख्यात व सराईत गुन्हेगार असल्याने प्रत्येकवेळी देषभरातील पोलीसांना चकवा देत होते. त्यांनी संपुर्ण भारत देषात आंध्रप्रदेष, ओडीसा, कर्नाटक, पष्चिम बंगाल, हरीयाना, उत्तर प्रदेष या राज्यांमध्ये गुन्हे केलेले आहेत, त्यांचेकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथे तपास चालु आहे
स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी मिळालेल्या बातमीस तात्काळ प्रतिसाद देऊन चित्तथरारक पाठलाग करून मोठया षिताफीने आरोपींना व लुटून नेलेल्या रू. 4,51,58,400/- किंमतीचे सिगारेट आरोपींसह पकडून चांगली कामगिरी केली आहे.