Home ताज्या बातम्या महाराष्ट्राचा चित्ररथ नाही यात मोदींचा दोष काय, भाजपाचा सवाल

महाराष्ट्राचा चित्ररथ नाही यात मोदींचा दोष काय, भाजपाचा सवाल

0

मुंबई : प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलानात महाराष्ट्राचा चित्ररथ असणार नाही. केंद्राने महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव नाकाराला आहे. त्यामुळे शिवसेनेसह अन्य पक्षांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर आता भाजपाने आपली भुमीका जाहिर करत यामध्ये पंतप्रधान मोदींचा काय दोष असा सवाल केला आहे.

“दरवर्षी 32 राज्यांकडून प्रवेशिका मागविल्या जातात. त्यापैकी 16 राज्यांची निवड होते. केंद्र सरकारचे 8 मंत्रालय असे दरवर्षी केवळ 24 चित्ररथ असतात. वेगवेगळ्या राज्यांना प्रतिनिधीत्त्व मिळावे, म्हणून रोटेशन पद्धतीने निवड होते. महाराष्ट्राला यापूर्वी अनेकदा प्रतिनिधीत्त्व नव्हते.ते वर्ष असे: 1972, 1987, 1989, 1996, 2000, 2005, 2008, 2013, 2016. ही वर्ष पाहिली तर दोन अपवाद वगळता केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचेच सरकार होते. मग मा. मोदीजींनी महाराष्ट्र-पं.बंगाल वगळले, अशी टीका आताच का?” असं भाजपाने ट्विटरवरून म्हटले आहे.

महाराष्ट्राला यापूर्वी अनेकदा प्रतिनिधीत्त्व नव्हते.ते वर्ष असे: 1972, 1987, 1989, 1996, 2000, 2005, 2008, 2013, 2016. ही वर्ष पाहिली तर दोन अपवाद वगळता केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचेच सरकार होते. मग मा. मोदीजींनी महाराष्ट्र-पं.बंगाल वगळले, अशी टीका आताच का? @rautsanjay61 (3/3)

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 2, 2020
दरम्यान, 26 जानेवारीला राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ असणार नाही. महाराष्ट्र सरकारच्या अर्जावर चित्ररथाची निवड झाली नाही. गृहमंत्रालाय आणि संरक्षण मंत्रालयाने 32 राज्याच्या अर्जावर विचार करत फक्त 16 राज्याच्या चित्ररथला राजपथावर पथसंचलनाला परवानगी दिली आहे. यामुळे यावेळी पथसंचलनामध्ये इंडीया गेटच्या राजपथावर महाराष्ट्रचा चित्ररथ दिसणार नाही. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र टीका केली आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे असे मत त्यांना व्यक्त केले आहे.

प्रजासत्ताकदिनी राजधानीत होणाऱ्या संचलनात यावर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाहीये. केंद्रसरकारने महाराष्ट्र व बंगालसह काही राज्यांचे चित्ररथ नाकारलेत. त्यावर प्रतिक्रिया देताना देशाच्या सर्वोच्चपदी बसलेले पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे कोत्या मनोवृत्तीचे असून महाराष्ट्राशी आकसाने वागत असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात व समाजसुधारणेत महाराष्ट्र व बंगालचे सर्वाधिक योगदान आहे. असे असताना महराष्ट्राचा चित्ररथ नाकारणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणारी जनता धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया राज्याचे कॅबिनेटमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली.