महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे अभिनंदन – क्रीडामंत्री सुनील केदार

महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे अभिनंदन – क्रीडामंत्री सुनील केदार
- Advertisement -

मुंबई, दि. १३ : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील सहभागी चमूने महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखली. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये ४५ सुवर्ण पदकांसह १२५ पदकांची कमाई करणाऱ्या महाराष्ट्राच्या चमूचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी अभिनंदन केले.

पंचकुला (हरयाणा) येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये अंतिम पदक तालिकेत ४५ सुवर्ण ४० रौप्य आणि ४० कांस्य पदकांची कमाई केली आहे. या यशासाठी स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि व्यवस्थापक आदींचे तसेच खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांचेही श्री.केदार यांनी अभिनंदन करुन या चमूचे राज्यात विशेष कौतुक सोहळा आयोजित करून योग्य तो सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

0000000

- Advertisement -