Home ताज्या बातम्या महाराष्ट्रातील आगामी सरकार कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न नक्कीच सोडवेल-उज्ज्वलाताई संभाजी पाटील

महाराष्ट्रातील आगामी सरकार कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न नक्कीच सोडवेल-उज्ज्वलाताई संभाजी पाटील

0

बेळगांव : (डॉ विनोद खाडे) महाराष्ट्रात जे सरकार आता येईल ,ते नक्कीच कर्नाटक-बेळगाव सीमाप्रश्न सोडवेल.कन्नडिकांचे विविध अत्याचारांपासून सीमावासियांना मुक्ती मिळेल असा ठाम विश्वास ;
बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणारे ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख होती असे दिवंगत माजी आमदार संभाजी पाटील यांच्या सुविद्य पत्नी उज्ज्वलाताई पाटील यांनी व्यक्त केला.
नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र च्या प्रतिनिधींचा कोल्हापूर बेळगाव व गोवा दौरा राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता.
बेळगावातील मा आ संभाजी पाटील यांचे कार्यालयात एनयुजेमहाराष्ट्र प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले .
त्याप्रसंगी पत्रकारांना संबोधित करताना उज्ज्वलाताई बोलत होत्या , ‘आगामी सरकारमधील प्रमुखांना सीमावासियांच्या वेदना माहिती आहेत मात्र महाराष्ट्रातील सध्याच्या पिढीला कर्नाटक- महाराष्ट्र सीमावाद हा विषयही माहिती नाही. तो आपण प्रखरतेने पोहचवू शकता असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजक एनयुजेएम बेळगाव जिल्हाध्यक्ष श्रीकांत काकतीकर यांनी प्रास्ताविक करून या भेटीमागील भूमिका सांगितली.
एनयुजेमहाराष्ट्राच्या वतीने अध्यक्ष शीतल करदेकर यांनी साहेब फाऊंडेशनने या ऐतिहासिक दोर्यास सहकार्य केल्याबद्दल अध्यक्षा उज्ज्वलाताई पाटील यांचा शाल श्रीफळ आणि पुस्तक देऊन सन्मान केला.
याप्रसंगी बोलताना शीतल करदेकर म्हणाल्या की, भाषावर प्रांतरचनेनुसार विभागणी करताना सीमाभागातील मराठी माणसांवर अन्याय झालेला आहे.
माननीय शरद पवार यांनी हा विषय सोडवण्यासाठी पूर्वी मध्यवर्ती मार्ग काढला होता मात्र या आंदोलनातील मुखवटेधारी लांडग्यांनी त्यावेळी विस्कोट केला आणि आपल्या फायद्यासाठी सीमाप्रश्न धगधगत ठेवला .आता मात्र मराठी बांधव, माता-भगिनींवर होणारे अन्याय थांबले पाहिजेत . बेळगावसह सीमावर्तीय भागातील सर्वच बंधू-भगिनी महाराष्ट्राच्याच आहेत आणि म्हणून जे सहकार्य करता येईल ते सहकार्य आम्ही आमच्या माध्यमातून करूच. येत्या काळात बेळगाव सह संयुक्तमहाराष्ट्र नक्कीच होईल आणि त्यावेळी आनंद उत्सव साजरा करणेसाठी आम्ही पुन्हा बेळगावात येउच!
एनयुजेएमसंघटन सचिव कैलास उदमले यांनी सांगितले की ही पुस्तिका नगरसेवक ग्रामसेवक जिल्हा सदस्य यांच्या माध्यमातून गावोगावच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास पत्रकारांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे आणि ते आम्ही करूच!
या पत्रकार संवाद कार्यक्रमास बेळगावचे मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बेळगावचे माजी आमदार शिक्षण महर्षी परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र एकीकरणाचा इतिहास सांगताना मा आमदार संभाजी पाटील यांचे महाराष्ट्र एकीकरणासाठीचे योगदान व कार्य सांगितले, तसेच उज्ज्वलाताईंची तेव्हाची साथ आणि सध्याचे कार्य या विषयी मिहिती दिली
मारूती मारागन्नाचे(माजी अध्यक्ष,ग्रामपंचायत)कोनेरी बेळेकुंद्री,परशुराम कुंडेकर,आदिनाथ देसाई हे महाराष्ट्र एकिकरण समितीचे कार्यकर्ते
जयवंत बडिवाले ,जाँन्सन राँड्रीक्स(मँनेजर,माजी आमदार संभाजी पाटील)
तसेच,एनयुजेएम बेळगावचे मार्गदर्शक उपेंद्र बाचीकर उपाध्यक्ष विश्वनाथ वेळ्ळूरकर,सचिव जितेद्र पाटील,कोषाध्यक्ष गिरीश कल्लेद, अमृत बिर्जे , निलिमा लोहार ,अनंत कंग्राळकर ,मुक्तीधामचे विजय सावंत आदी मान्यवर, पत्रकार तसेच एनयुजे महाराष्ट्र संघटन सचिव विशाल सावंत,कोषाध्यक्ष वैशाली आहेर,राज्यसहसचिव सतीश रुपवते,रायगड अध्यक्ष सुवर्णा दिवेकर, रायगड उपाध्यक्ष सुनिल कटेकर ,कोल्हापुरचे डाँ सुभाष सामंत ,विश्वास दिवे,नाशिक अध्यक्ष राम ठाकूर,सांगलीचे अध्यक्ष लक्ष्मण खटके,औरंगाबाद अध्यक्ष डाँ अब्दूल कादिर, तसेच सांगली,कोल्हापूर,लातूर,सोलापूर,जालना,नगर,पुणे आदि जिल्ह्यांतील पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते