Home ताज्या बातम्या महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यातील वेतनि होमगार्ड अधिकाऱ्यांना खाकी गणवेश घालण्याची परवानगी शासनाने दिलेले नाही

महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यातील वेतनि होमगार्ड अधिकाऱ्यांना खाकी गणवेश घालण्याची परवानगी शासनाने दिलेले नाही

दर्शन पोलिस टाइम लाईव्ह टीम :- परवेज शेख

माहिती अधिकारात उघड झाले आहे गेले कित्येक वर्ष वेतनिय निदेशक कर्मचारी यांना शासन मान्य गणवेश नसतानाही ते अनधिकृतरित्या परिधान करत होते होमगार्ड अधिकरी यांचे सारखाच गणवेश तसेच पोलिस ट्रेनिंग इंस्ट्रक्टर सारखा गणवेश. पांढरी टी शर्ट व खाकी पँट . गणवेश नसताना गणवेश परिधान करणे ही अत्यंत गंभीर बाब आम नागरिकाने किंवा मानसेवी होमगार्ड ने किंवा अधिकाऱ्याने असा गणवेश परिधान केला असता तर त्याच्यावर 420 चा गुन्हा दाखल झाला असता त्यांच्यावर कारवाई ही झाली असती सेवा समाप्त झाली असती निलंबित केले असते. पण माहिती अधिकारात उघड झाले आहे. कोणत्याही निदेशकावर कारवाई नाही. साधी करणे दाखवा नोटीस देखील दिलेली नाही. तसेच या कार्यालयाने शासनाला खोटी माहिती दिली आहे. “अभिप्राय
निदेशक वर्गीय कर्मचारी यांना गणवेष विहीत करण्यात आलेला नाही. तथापि गणवेषधारी
होमगार्ड यांना प्रशिक्षण देताना होणा-या अडचणी विचारात घेऊन निदेशक स्वखर्चाने होमगार्ड सारखा गणवेष घेऊन प्रशिक्षणा दरम्यान परिधान करीत असत. तथापि सदर गणवेश शासनमान्य नाही.” यामध्ये निदेशक हे होमगार्ड सारखे गणवेश परिधान करीत नव्हते तर मानसेवी होमगार्ड अधिकारी यांचेसारखे गणवेश घालत होते. हे निदेशक प्रशिक्षण दरम्यान नाही तर त्याव्यतिरिक्त साप्ताहिक कवायत १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे व होमगार्डच्या सर्व कार्यक्रमात हे निदेशक गणवेश परिधान करत होते. पण एवढे वर्ष सर्वजण आंधरात.
आता होमगार्ड चुकीचा गणवेश घालतात म्हणून त्यांना दम देतात शिस्त भंगाची कारवाई करण्याची, होमगार्ड मधून काढून टाकण्याची धमकी देतात.
तर एवढे वर्षे हे निदेशक चुकीचा बेकायदेशीर गणवेश घालत होते तर त्यांना कोणती शिक्षा देणार?होमगार्ड ही गणवेश धारी संघटना आहे. शिस्त ही असायलाच पाहिजे याबद्दल प्रश्नच नाही नियम ही असायलाच पाहिजे याबद्दल प्रश्नच नाही. पण जे काय करायला पाहिजे ते नियमात राहून करायला पाहिजे. जर आपण दुसऱ्याकडून काहीतरी अपेक्षा करतो तर त्याला ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्याला काहीतरी देणे आवश्यक आहे? थोडक्यात सांगायचं असेल तर जर आपण जमिनीत धान्य पेरलं नसेल तर उगवण्याची अपेक्षा का करावी? शेवटी हेच मी सांगेल किती झालं तरी मानसेवी होमगार्ड यांनी बेशिस्त वर्तन करू नये अनाधिकृत कोणतेही आर्टिकल घालू नये हीच सर्वांना विनंती आहे. नाहीतर तुमची सेवा समाप्ती, निलंबन, शिस्तभंगाची, कारवाई याला तर सामोरे जावेच लागेल कारण तुम्ही मानसेवी आहात. तुमची बाजू कोण मांडणार नाही आणि तुमचं कोण ऐकूनही घेणार नाही त्यासाठी सर्वांनी सावध रहा.

प्रत माहितीसाठी संपूर्ण ३४ जिल्ह्यातील
जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलिस अधीक्षक यांच्यासाठी

आपला
होमगार्ड संघर्ष समिती समिती
पोलीस बॉईज असोसिएशन
९८६७७७०४८४

तक्रारदार मा श्री उदय पाटील साहेब