महाराष्ट्राला हवा आणखी २०० मेट्रिक टन ऑक्सिजन; केंद्राला लिहिले पत्र

महाराष्ट्राला हवा आणखी २०० मेट्रिक टन ऑक्सिजन; केंद्राला लिहिले पत्र
- Advertisement -

हायलाइट्स:

  • राज्यात करोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा
  • मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी लिहिलं केंद्र सरकारला पत्र
  • ऑक्सिजन पुरवठ्यात २०० मेट्रिक टन वाढ करण्याची मागणी

मुंबई: करोनाबाधित रुग्णांच्या संख्येच्या प्रमाणात राज्यात ऑक्सिजनची गरजही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सध्याचा ऑक्सिजन पुरवठा आणखी २०० मेट्रिक टनाने वाढवावा, अशी विनंती राज्य सरकारनं केंद्र सरकारला केली आहे. (Maha Vikas Aghadi Government Writes To Central Government)

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्र लिहिलं आहे. त्यात राज्यातील करोनाची स्थिती विषद करतानाच त्यांनी वाढीव ऑक्सिजनची मागणी केली आहे. राज्याला जवळच्या आणि सोयीच्या ठिकाणाहून ऑक्सिजन पुरवठा लगेच सुरू करण्यात यावा, असं कुंटे यांनी पत्रात म्हटलं आहे. ऑक्सिजनची अनावश्यक मागणी केली जाऊ नये म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन ऑडिट केले जात आहे, अशी ग्वाही देखील राज्य सरकारनं केंद्राला दिली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांना लिहिलेल्या पत्रात कुंटे म्हणतात…

  • करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. सध्या राज्यात ६,६३,७५८ बाधित रुग्ण असून ७८,८८४ रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. पैकी २४,७८७ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये करोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. तिथं ऑक्सिजनची गरजही अधिक आहे.

  • यापूर्वी केंद्र सरकारनं आरआयएनएल (विझाग), जिंदाल स्टील प्लांट, अंगुल, ओडिशा येथून देऊ केलेला ऑक्सिजन पुरवठा कागदावरच राहिला आहे. त्यामुळं यापुढचा वाढीव पुरवठा राज्याला जवळच्या आणि सोयीच्या ठिकाणाहून होणं गरजेचं आहे.

  • गुजरातमधील जामनगर येथून दिवसाला होणारा ऑक्सिजन पुरवठा १२५ ऐवजी २२५ मेट्रिक टन करावा. त्याचबरोबर, येथील प्लांटमधून सध्या होणारा पुरवठा १३० मेट्रिक टनवरून २३० मेट्रिक टन करावा. ही ठिकाणे भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रापासून जवळ असल्यानं वाहतुकीचा वेळ कमी होऊन रोजची मागणी व पुरवठ्यामध्ये समन्वय राखता येईल.

  • केंद्र सरकार सिंगापूर, दुबई व अन्य देशांकडून आयएसओ टँकर घेत आहे. यापैकी किमान दहा एलएमओ (लिक्विड मेडिकल ऑक्सिजन) टँकर महाराष्ट्राला मिळावेत, जेणेकरून अंगुल येथून रोरो सेवेमार्फत ऑक्सिजन आणता येईल.

आणखी वाचा:

बाळासाहेब थोरात यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; पत्रकारांसाठी केली ‘ही’ विनंती

नाहीतर लोकशाही संपली असं जाहीर करा: राष्ट्रवादी काँग्रेस

Source link

- Advertisement -