Home शैक्षणिक महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा

0

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा

पुणे : परवेज शेख

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या शाळा, महाविद्यालये आणि ग्रंथालयांमध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.

रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांचे वाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला यावेळी ‘ पुस्तक वाचनाचे महत्त्व ‘ या विषयावर सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली . चौधरी सौद युनूस,जिया सादिक पठाण आणि अयान सय्यद यांनी यश मिळवले . ग्रंथपाल चंदा सुपेकर यांनी संयोजन केले.

एम ए रंगूनवाला दंत महाविद्यालयामध्ये पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्राचार्य डॉ रमणदीप दुग्गल यांनी उद्घाटन केले. ग्रंथालयाच्या चांगल्या उपयोगाबद्दल मुस्कान शेख या विद्यार्थिनीला पारितोषिक देण्यात आले .यावेळी ग्रंथपाल निलोफर खान आणि प्राध्यापक ,विद्यार्थी उपस्थित होते.

त्याचबरोबर अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल मध्येही वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य परवीन शेख यांनी स्वागत केले. दुर्मिळ पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते .डॉ अब्दुल बारी यांनी उद्घाटन केले. महात्मा ज्योतिबा फुले आणि फातिमा शेख यांनाही वंदन करण्यात आले.