Home ताज्या बातम्या महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे पैगंबर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे पैगंबर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक

0

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे
पैगंबर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक

पुणे : परवेज शेख

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ( आझम कॅम्पस )तर्फे रवीवार,१० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० पासून हजरत महंमद पैगंबर जयंती (ईद – ए – मिलाद)निमित्त अभिवादन मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे .

संस्थेचे सचिव लतीफ मगदूम यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन होईल.आझम कॅम्पस ,ट्राय लक चौक ,कुरेशी मशीद,बाबाजान दर्गा,क्वार्टर गेट चौक ,एडी कॅम्प चौक,भारत सिनेमा ,चुडामण तालीम ,पूना कॉलेज असा अभिवादन मिरवणुकीचा मार्ग आहे.

या मिरवणुकीत प्रेषित महमद पैगंबर यांच्या मानवतावादी, शिक्षण विषयक, पर्यावरणविषयक शिकवणुकीचे संदेश देणारे फलक हाती घेतले जाणार आहेत. संस्थेच्या ३० शैक्षणिक आस्थापनातून ५ हजार विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक , विश्वस्त, संचालक तसेच ‘अवामी महाज ‘ या सामाजिक संस्थेचे सदस्य सहभागी होणार आहेत . मिरवणुकीत बग्गीत अरबी वेशातील मुले सहभागी होणार आहेत .

या अभिवादन मिरवणुकीचे हे १५ वे वर्ष आहे . संस्थेतर्फे दरवर्षी छ. शिवाजी महाराज, महात्मा गांधी, म.फुले, डॉ.आंबेडकर तसेच प्रेषित महमद पैगंबर या महामानवांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन मिरवणुका काढल्या जातात. आणि मानवतावादी संदेश दिले जातात