महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) तांत्रिक सहायक, विमा संचालनालय संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) तांत्रिक सहायक, विमा संचालनालय संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
- Advertisement -

मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०६ ऑगस्ट, २०२२ व दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ मधील तांत्रिक सहायक, विमा संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण १४ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात आली आहे.

या परीक्षेमध्ये सांगली जिल्ह्यातील मंजूनाथ गोपाळ पाटील हे राज्यातून प्रथम आले आहेत. मागास वर्गवारीतून हिंगोली जिल्ह्यातील ओमेश किसन पायघन प्रथम आले आहेत. महिला वर्गवारीतून अमरावती जिल्ह्यातील श्रीमती अंकिता सुरेश पाचंगे  ह्या प्रथम आल्या आहेत.उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

- Advertisement -