महाराष्ट्र राज्य लॉटरी मासिक व साप्ताहिक सोडत – महासंवाद

महाराष्ट्र राज्य लॉटरी मासिक व साप्ताहिक सोडत – महासंवाद
- Advertisement -

मुंबई, दि. ०७ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. महाराष्ट्र सह्याद्री, महाराष्ट्र गणेशलक्ष्मी माघी गणपती विशेष, महाराष्ट्र गौरव, महाराष्ट्र तेजस्विनी व महाराष्ट्र गजराज या मासिक सोडतीमध्ये ज्या तिकीट खरेदीदारांना बक्षीस जाहीर झाली आहेत त्यांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रुपये दहा हजारावरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांच्या कार्यालयाकडे करावी, असे उपसंचालक (वित्त व लेख) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

महाराष्ट्र सहयाद्री या लॉटरीची सोडत ११ फेब्रुवारी २०२५ रोजी, महाराष्ट्र गणेशलक्ष्मी माघी गणपती विशेष  लॉटरीची सोडत १५ फेब्रुवारी २०२५,  महाराष्ट्र गौरव लॉटरीची सोडत १९ फेब्रुवारी २०२५ रोजी, महाराष्ट्र तेजस्विनी लॉटरीची सोडत २१ फेब्रुवारी २०२५ रोजी तर महाराष्ट्र गजराज लॉटरीची सोडत २५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता काढण्यात आल्या.

महाराष्ट्र सह्याद्री तिकीट क्रमांक MS-२५०२ D /४१३८९१ या सिद्धी समर्थ एजन्सी, दादर, मुंबई यांच्याकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.११ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे. महाराष्ट्र गणेशलक्ष्मी माघी गणपती तिकीट क्रमांक GS०१ / ७१९१ या प्रिंन्स लॉटरी सेंटर, कल्याण यांच्याकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.२२ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे. महाराष्ट्र तेजस्विनी तिकीट क्रमांक TJ-०८ / ५७०४ या कोमल एजन्सी, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.२५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे. महाराष्ट्र गजराज तिकीट क्रमांक GJ००/४२०० या सिद्धी समर्थ एजन्सी, दादर, मुंबई यांच्याकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.१४ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे. तसेच महाराष्ट्र सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. ७ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण ९ बक्षिसे जाहीर झाली आहेत.  याशिवाय फेब्रुवारी २०२५ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून १४८५६ तिकीटांना रू. १,०७,०३,०००/- व साप्ताहिक सोडतीतून ५४,२६१ तिकीटांना रू. २,१७,४२,६००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व तिकीट खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रूपये १० हजार वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाय, ए-वन,अतिरिक्त शॉप कम गोडाऊन, एपीएमसी मार्केट, सेक्टर -१९ बी, वाशी, नवी मुंबई या कार्यालयाकडे सादर करावी. दहा हजार रुपयांच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असेही प्रसिद्धी पत्रकात उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळविले आहे.

०००

गजानन पाटील/स.सं

- Advertisement -