Home गुन्हा महावितरणच्या अभियंत्यास लाच घेताना एसीबीने केली रंगेहाथ अटक

महावितरणच्या अभियंत्यास लाच घेताना एसीबीने केली रंगेहाथ अटक

0

वसई: वसईत महावितरण कंपनीच्या वालीव विभाग सहाय्यक अभियंता वर्ग-2 च्या कश्यप मनोहर शेंडे या आरोपीला सहा हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पालघर युनिटने रंगेहाथ अटक केली असल्याची माहिती पालघर एसीबीचे उपअधीक्षक के.हेगाजे यांनी लोकमतला दिली.

अधिक माहितीनुसार,मीटर रिडींगचे रिडक्शन लोड कमी करण्यासाठी महावितरण कंपनीचा तक्रारदार ठेकेदार यांच्याकडे त्याच्या सर्वसामान्य वीज ग्राहकाने मीटर रिडींगबाबत रिडक्शन लोड कमी करण्यासाठी रितसर अर्ज केला होता. मात्र, या संदर्भा तक्रारदार यांचे काम करुन देण्यासाठी लाचखोर शेंडे यांनी बुधवारी ६ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार पैसे कुठून देणार यानिमित्ताने बुधवारी ग्राहकाच्यावतीने महावितरणच्या एजंट ठेकेदाराने पालघर एसीबीकडे रीतसर तक्रार दाखल केली.

अखेर ठरल्यानुसार गुरुवारी रक्कम घेऊन या काम करून देतो असे सांगून सहाय्यक अभियंता कश्यप यांने गुरुवारी ६ हजार रुपये लाचेची रक्कम वालीवमध्ये  एका मोटारगाडीत  स्वीकारली त्याचवेळी पालघर युनीटने त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पालघर पोलीस उपअधीक्षक यांनी लागलीच आरोपीला ताब्यात घेऊन वालीव पोलीस ठाण्यात लाच स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.

या कारवाईत मुकूंद हातोटे अपर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर पोलीस उपअधीक्षक के. हेगाजे यांच्या नेतृत्वाखाली भारत साळुंखे पोलीस निरीक्षक ,पोहवा कदम, पो हवा मदने पोना ,सुवारे, पोना पालवे, पोकॉ सुमडा, मापोना,मांजरेकर, चापोशि दोडे यांनी विशेष मेहनत घेतली.