महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग करून तिचे बनावट फेसबुक खाते तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

- Advertisement -

परवेज शेख नगर जिल्हातील लोणी येथील विराज राजेंद्र विखे याच्याविरुद्ध महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग करून तिचे बनावट फेसबुक खाते तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो लोणी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,पीडित तरुणी 2017 ते 2018 मध्ये प्रवरानगर लोणी येथे पद्मश्री विखे पाटील कॉलेजला शिक्षण घेत होती. विराज विखे याने युवतीचा वेळोवेळी पाठलाग करून छेडछाड केली.

‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे म्हणून तू जर मला हो म्हणाली नाही तर मी माझे जीवाचे बरे-वाईट करीन, असे म्हणून वेळोवेळी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

त्यामुळे सदर युवती शिक्षण अर्धवट सोडून अहमदनगर येथे पुढील शिक्षण घेत होती. विराज विखे युवतीच्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट खोलून तिची बदनामी केली.

बदनामी करण्याच्या हेतूने नातेवाईकांना फ्रेंड रिक्वेस्ट टाकून विराज विखे हा अहमदनगर येथे आला आहे, असे लोकेशन फेसबुकवर टाकून युवतीस भीती दाखवून दबाव आणण्याचा प्रयत्न करून पाठलाग केला.

याप्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी कलम 354, 506, 507 तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा लोणी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

- Advertisement -