Home शहरे औरंगाबाद महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ

महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ

0

खुलताबाद  : महाशिवरात्री निमित्त  वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीरात रात्री बारावाजेपासून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी हर हर महादेव , ओम नम: शिवायचा जयघोष करत हजारो भाविकांनी दर्शन घेतले.  

वेरूळ येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते. दुपारी चार वाजता पालखी सवाद्य मिरवणुक शिवालय तीर्थकुंडावर जाते तेथे महापुजा झाल्यानंतर परत वाजत गाजत मंदीरात येते. रात्री बारा वाजता शासकीय महापुजा जिल्हाधिकारी उदय चौधरी व पोलीस अधीक्षक ग्रामीण मोक्षदा पाटील तसेच माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते होणार आहे.  दरम्यान, दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने मंदिर परिसरात पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. औरंगाबाद ते वेरूळ महामार्गावर जादा बसेसची व्यवस्थासुधा करण्यात आली आहे. महाशिवरात्री निमित्त मंदीरात महाप्रसादाचे वाटप तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.