यासाठी ‘बिटरस्वीट’ या चित्रपटाची अधिकृत निवड झाली असून चित्रपटाच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होतोय. या चित्रपटात महाराष्ट्रातील महिला ऊस कामगारांच्या भावनिक कोंडीचं नाट्य दाखवलं आहे.
बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृत निवड झालेल्या ‘बिटरस्वीट’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर झाला होता. स्क्रीन इंटरनॅशनलमध्ये या चित्रपटाची वाहवा झाली असून त्यातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अक्षया गुरवच्या कामाचं कौतुक केलं गेलं. एका प्रसिद्ध वृत्तपत्रात अनंत महादेवन यांनी ‘बीड: अ व्हिलेज ऑफ वूमन विदाऊट वॉम्ब्स’ हा मथळा वाचला होता. हे वाचून ते एवढे प्रभावित झाले की त्यांनी चित्रपटाचं चित्रीकरण खऱ्या गावात जाऊन करायचं ठरवलं. यात त्यांनी बीड येथील खऱ्या ऊस कामगारांबरोबर सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, गुरु ठाकूर, भाग्यश्री पाने आणि अनिल नगरकर या अनुभवी आणि ताकदीच्या कलाकारांची निवड केली. कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि हेनन आयर्लंड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृतपणे निवड झालेल्या या स्फोटक सामाजिक विषयावरील संवेदनशील चित्रपटाचं सर्वत्र कौतुक झालं.
महाराष्ट्र राज्य व सांस्कृतिक विकास महामंडळ कान्स येथे होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत उत्सुक आहे. निर्माते सुचंदा चटर्जी आणि शुभा शेट्टी यांचा ‘बिटरस्वीट’ हा पहिला चित्रपट आहे. निर्मात्यांच्या पदार्पणातील चित्रपटालाच बरंच नावाजलं गेलंय. कान्स येशील मार्श दू फिल्म सेक्शनसाठी सलग दुसऱ्यांदा अनंत महादेवन यांच्या सिनेमाची निवड झाली आहे. गेल्या वर्षी त्यांच्या ‘माई घाट‘ या चित्रपटाची निवड झाली होती.
महाराष्ट्र सरकारनं मार्श दू फिल्म सेक्शनसाठी ‘बिटरस्वीट’ची केलेली निवड खूप महत्त्वाची आहे; कारण ही निवड अनुभवी आणि ज्येष्ठ परीक्षकांनी केली आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या महोत्सवात भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सर्वोत्कृष्ट म्हणून निवड होणं हा खरोखरच सन्मान आहे. गेल्या वर्षी माहिती आणि प्रसारणाद्वारे ‘माई घाट’ हा सिनेमा पाठवला होता आणि यावर्षी ‘बीटरस्वीट’. सलग दोन वर्षं हा आनंद मिळतोय.
– अनंत महादेवन, दिग्दर्शक
बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नामांकन मिळाल्यानंतर आणि वर्ल्ड प्रीमिअर झाल्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारचा सन्मान होणं ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र सरकारनंदेखील त्याची दखल घेत कौतुक केल्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळालं आहे.
– सुचंदा चटर्जी आणि शुभा शेट्टी, निर्माते