Home गुन्हा महिला तहसीलदार यांचेवर हल्ला करणारा जेरबंद

महिला तहसीलदार यांचेवर हल्ला करणारा जेरबंद

0


परवेज शेख शिरूर पोस्टे हद्दीत महिला तहसीलदार यांचेवर हल्ला करणारा वाळू माफिया शिक्रापूर येथून स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचेकडून जेरबंद दिनांक 14/2/2020 रोजी दाखल असून फिर्यादी शिरूरचे तहसीलदार श्रीमती लैला दावल शेख यांच्या घरासमोर दिनांक 14/2/2020 रोजी पहाटे 4.00 वाजण्याच्या सुमारास आलेल्या 5 ते 6 अनोळखी इसमांनी वाळू चोरीची कारवाई टाळणेसाठी मा.तहसिलदार यांचे निवासस्थांनी पाळत ठेवत असताना विचारणा केली असता कारवाई करणेस अडथळा करत शासकीय कामात अडथळा करून मा.तहसिलदार महोदया यांना धमकावून पळून गेले होते.मा.पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे आदेशान्वये रेकॉर्डवरील पाहिजे व फरार आरोपी यांचा हद्दीमध्ये शोध घेत असताना आज दिनांक 19/2/2020 रोजी वरील गुन्हा हा स्वप्निल साहेबराव जाधव वय 23 रा. रामलिंग रोड शिरूर याने त्याचे इतर साथीदार यांचे मदतीने केल्याबाबत माहिती मिळाल्याने त्यास वर नमूद ठिकाणी ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीस पुढील तपास कामी शिरूर पोस्टेचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/ दत्तात्रय गुंड,सफौ/ दत्तात्रेय गिरमकर पोना/ ज्ञानेश्वर क्षिरसागर,पोनाजनार्दन शेळके,पोना/एम.आय.मोमीन पोहवा/काशिनाथ राजापुरे यांनी केलेली आहे.