Home बातम्या महत्वाच्या बातम्या महिला व मुलींकरिता सरकार मान्यता प्राप्त टेलरिंग प्रशिक्षण सुविधा

महिला व मुलींकरिता सरकार मान्यता प्राप्त टेलरिंग प्रशिक्षण सुविधा


      शिवण कलेची आवड व शिक्षण घेण्याची पात्रता असणा-या इच्छुक महिला व मुलींकरिता नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ सरकार मान्यता प्राप्त टेलरिंग प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येत असून सन 2019-20 या वर्षाकरिता प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.

      या सहामाही व्यवसाय अभ्यासक्रमाची जुलै 2019 आणि डिसेंबर 2019 अशी दोन प्रवेश सत्र असणार आहेत. यामधील ‘शिवण – कर्तन’ अभ्यासक्रमासाठी 7 वी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता असणार असून या अभ्यासक्रमात लहान मुले, स्त्रिया व पुरुष यांचे एकूण 30 प्रकारचे कपडे तयार करणे शिकविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, ‘स्पेशलायझेशन इन ब्लाऊज’ अर्थात ‘ब्लाऊज फॅशन डिझायनिंग’ या अभ्यासक्रमाची पात्रता 8वी उत्तीर्ण आहे तसेच शिवण-कर्तन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

      या अभ्यासक्रमांकरिता अत्यंत नाममात्र असे केवळ शासनाचे प्रवेश परीक्षा शुल्क आकारले जात असून लाभार्थी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. यादृष्टीने वास्तव्याचा पुरावा म्हणून मालमत्ता कराची पावती / मतदान कार्ड / आधार कार्ड / रेशन कार्ड असा पुरावा सादर करणे गरजेचे राहिल. हा अभ्यासक्रम मराठी, हिंदी व इंग्रजी या माध्यमांत उपलब्ध आहे. यामध्ये प्रवेश घेण्याकरिता शाळेचा दाखला व गुणपत्रक असणे आवश्यक आहे तसेच विवाहीत महिलांसाठी विवाह नोंदणी दाखला आवश्यक आहे. तसेच लाभार्थ्यास स्वत:चे आधार कार्ड व पॅन कार्ड जोडणे आवश्यक राहिल.

      31 मार्च 2019 हा प्रवेश अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक असून रू. 300/- इतके नाममात्र प्रवेश शुल्क भरून या अभ्यासक्रमांकरिता प्रवेश घेता येऊ शकतो. विलंब शुल्कासह रू. 350/- इतकी रक्कम भरून 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत प्रवेश घेणे शक्य होणार आहे. याशिवाय 8 ते 18 ऑगस्ट 2019 या कालावधीत रू. 500/- मात्र अति विलंब शुल्क भरून प्रवेश घेता येऊ शकेल. सदर प्रशिक्षण मोफत असून केवळ शासनाचे प्रवेश परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.

      तरी जे इच्छुक लाभार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छितात त्यांनी प्रवेशासाठी किंवा अधिक माहितीसाठी 022 – 27563505 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा नवी मुंबई महानगरपालिका टेलरिंग क्लास,दत्तगुरूनगर, न.मुं.म.पा. ग्रंथालय, दुसरा मजला, से.-15, वाशी, नवी मुंबई (वर्ग शिक्षिका संपर्क क्र – 9867185830) किंवा जुने ग्रामपंचायत कार्यालय, खैरणे-बोनकोडे, नवी मुंबई (वर्ग शिक्षिका संपर्क क्र. – 9769901354) तसेच समाजविकास विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन, से.11, सी.बी.डी.,बेलापूर, नवी मुंबई (श्री. दादासाहेब भोसले, समाजसेवक – 9702974123) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.