एटा: उत्तर प्रदेशमधील एटा येथे नुतन यादव या महिला सरकारी वकिलाची सोमवारी मध्यरात्री राहत्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली असल्याची माहिती एटाचे पोलिस अधिक्षक संजय कुमार यांनी दिली आहे.
नुतन यादव यांच्या गावाकडील काही व्यक्ती त्यांच्याकडे रहायला आल्यावर ही घटना घडल्याचे उजेडात आल्याचे कुमार यांनी यावेळी सांगितले. यावेळी पोलिसांनी गावाकडून रहाण्यास आलेल्या संबंधीत व्यक्तींवरच संशय असल्याचे सांगताना महिला वकिलांच्या घरच्यांनीही त्यांच्यावरच संशय व्यक्त केल्याचे सांगितले आहे. तर, इटाचे वरिष्ट पोलिस अधिक्षक स्वप्निल मामगेन यांनी कुटूंबियांमधील वाद या हत्येला जबाबदार असल्याचा संशयही व्यक्त केला असून संबंधीत प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून लवकरात लवकर कारवाईला सुरूवात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
- Advertisement -