महेंद्रसिंग धोनीच्या लाडक्या लेकीचा पाचवा वाढदिवस झाला थाटामाटात साजरा, फोटो झाले वायरल

- Advertisement -

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या भारतीय संघात नाही. तो आपल्या कुटुंबियांबरोबर सुट्टी एन्जॉय करत आहे.

काही दिवसांपूर्वी धोनी आणि त्याची पत्नी साक्षी हे एका अभयारण्यातही गेले होते. त्यावेळी धोनीचे फोटो चांगलेच वायरल झाले होते.
सध्याच्या घडीला धोनीच्या विश्रांतीबरोबर त्याच्या भटकंतीची जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी त्याला आणि साक्षीचा एक व्हिडीओ चांगलाच वायरल झाला होता. आता त्याचे हे फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
आज धोनीची मुलगी झिवाचा पाचवा वाढदिवस आहे. हा वाढदिवस धोनीने थाटामाटात साजरा केला आहे. पण या वाढदिवसाचे फोटो चांगलेच वायरल झाले आहेत.
महेंद्रसिंग धोनीचे आपली लेक झिवावर किती प्रेम आहे, हे जगजाहीर आहे. आतापर्यंत धोनीने झिवाबरोबरचे आपले फोटो आणि व्हीडीओ बऱ्याचदा शेअर केले आहेत.
आयपीएलच्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली. तेव्हा सामना संपल्यावर झिवा धोनीला येऊ बिलगली होती. तेव्हाचा व्हिडीओही चांगलाच वायरल झाला होता.
- Advertisement -