माऊलींची सेवा
काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या निमित्तानं दिवे घाटात गेलो होतो. पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संतांच्या पालख्या त्याच दरम्यान घाटात पोहोचल्या होत्या. संपूर्ण घाट वारकरी आणि त्यांच्या वाहनांनी भरला होता. घाट असल्यामुळे त्या माऊलींना पुढेही जाता येईना आणि मागेही. वाहतूक सुरळीत करण्याचे पोलिसांचे प्रयत्न तोकडे पडू लागले. दिवे घाटात चालत असताना पावसाची रिपरिप आणि खोळंबलेल्या वाहतुकीमुळे अबालवृद्ध वारकरी बेहाल झाले होते. घाटात रस्त्यावर हजारो वारकरी चालत आहेत आणि दुसरीकडे ट्रकही पंढरीच्या दिशनं जात होते. त्यामुळे घाटात गर्दी झाली होती. त्यावेळी तिथे अडकलेल्या माऊलींना आणि गाड्यांना मार्ग दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरलो. यानिमितानं माझ्याकडून त्या माऊलींची सेवा झाली असं मी समजतो.
– आदेश बांदेकर, अभिनेते-निर्माते
त्यांना विठ्ठल दिसतो
ज्ञानोबा आणि तुकोबा या दोघांची वारी मी अनुभवली आहे. एकदा चहा प्यायला बसलेलो असताना तिथे बाजूलाच एक ७५-८० वर्षीय वारकरी बसले होते. त्यांना चहा देत मी विचारलं ‘माऊली, तुमच्याकडे काही बॅग वगैरे काहीच नाही. असं १८ दिवस कस काय जमणार?’ तर त्यांनी एक पिशवी दाखवून मला सांगितलं, ‘आपल्याला काय लागतंय एक जोडी कपडे. नदीत धुवायची, वाळवायची आणि वाळून झाली की निघायचं माऊलीकडे.’ हे सगळं ऐकल्यावर मी विचारलं, ‘या वारीसाठी पोरानं काय पैसे वगैरे दिलेत का?’ त्यावर त्यांचं उत्तर, ‘दिलेत की…१४० रुपये.’ ‘एवढ्यानं भागणार का सगळं’, मी विचारलं. त्यावर ते म्हणाले, ‘भागणार म्हणजे उरतील यातून काही पैसे. आता तुमच्या सारख्या माऊलीनं चहा पाजला. या वारीत सगळं मिळतं.’ त्यांच्या पायात चप्पल नव्हती. ते म्हणाले, ‘मी वारीला अनवाणीच येतो, माऊलीच्या ध्यानात पायाला काय रुतेल काय लागेल याची मला कधीच जाणीव झाली नाही.’ या सगळ्या बोलण्यानं मी भारावून गेलो. मला त्या क्षणाला जाणीव झाली माझ्यासारख्या सामान्य माणसाला विठ्ठलाची फक्त मूर्ती दिसते आणि या वारकरी माऊलीला विठ्ठल दिसतो.
– संदीप पाठक, अभिनेता
ऊर्जा देणारा अनुभव
‘गजर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्तानं २०१० साली मी पहिल्यांदा वारीला गेलो होतो. हा संपूर्ण चित्रपट वारीतच चित्रित झाला असल्यामुळे अठरा दिवस मी आणि माझी संपूर्ण टीम चित्रीकरणाबरोबरच वारीचाही आनंद घेत होतो. त्याच्यानंतरही कधी पालखी प्रस्थान सोहळ्या वेळी तर, कधी आषाढी एकादशीला मी पंढरपूरला गेलो आहे. वारीत लाखो भाविकांमध्ये राहून एक अख्खा चित्रपट करणं ही सोपी गोष्ट नाही. प्रत्येक वारकरी एक वेगळी भावना आणि नाद मनात घेऊन चालत असतो. त्यामुळे ‘गजर’चं चित्रीकरण हे एक आव्हान होतंच. पण, माऊली कृपेनं ते सुरळीत पार पडलं. वारी हा एक समुद्र आहे. आपण मात्र आपापल्या डबक्यात जगत असतो. वारी करतानाचा प्रत्येक क्षण मला नवी ऊर्जा आणि सकारात्मकता देऊन गेला आहे.
– चिन्मय मांडलेकर, लेखक-अभिनेता

ऐकण्यातून वारीचा आनंद
पंढरीच्या वारीचं आणि माझं नातं हे माझ्या आईमुळे निर्माण केलं. पंढरीच्या वारीला आई न चुकता जात असे. तिला त्या वारीत राहून त्या वारकऱ्यांची सेवा करणं आवडतं. वारकऱ्यांची सेवा करणं म्हणजेच माऊलीची सेवा करणं असं ती म्हणत. वारीला तिला जाताना बघून मला फार छान वाटायचं. ती एका टेम्पोत बसून वारीला जायची. तिथे वारकऱ्यांची सेवा करून १८ दिवस राहून माऊलीची सेवा करायची. त्या दरम्यान तिथे घडणारे किस्से, आठवणी ती घरी आल्यावर आम्हाला सांगत बसायची. ते ऐकताना आम्ही भारावून जायचो. मी कधी वारी केली नाही; पण आईचा अनुभव ऐकण्यात वारी अनुभवली आहे.
– प्रियांका बर्वे, गायिका
शब्दांकन : सुरज कांबळे
- Advertisement -