Home शहरे अकोला मागासवर्गीय कल्याणाकारी योजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी करावी – पालकमंत्री दादाजी भुसे

मागासवर्गीय कल्याणाकारी योजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी करावी – पालकमंत्री दादाजी भुसे

0
मागासवर्गीय कल्याणाकारी योजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी करावी – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक: दिनांक 09 फेब्रुवारी, 2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा परिषदेच्या 20 टक्के मागासवर्गीय सेस मंजूर निधीतून महिला, बेरोजगार युवक व विद्यार्थिनींना विविध साहित्याचे वाटप पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज करण्यात आले. मागसवर्गीयांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत 80 मागासवर्गीय बेरोजगार युवकांना 1 कोटी 60 लाख निधी सेस निधीतून मालवाहतूक व्यवसायासाठी चारचाकी वाहनांचे वाटप करण्यात आले. तसेच 12 लाख 90 हजार निधीतून 30 महिला लाभार्थ्यांना मसाला कांडप यंत्राचे वाटप आणि  3 लाख 85 हजार निधीतून 700 सायकली मागसवर्गीय विद्यार्थिंनींना देण्यात आल्या आहेत. त्यातील प्रातिनिधीक स्वरूपात 59 विद्यार्थींनींना सायकलींचे वाटप व 30 बेरोजगार युवकांना चारचाकी वाहनांचे वाटप पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्हा परिषदेला देण्यात आलेल्या 9 रूग्णवाहिकांचे लोकार्पण सुद्धा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

000