अमरावती : मागील 5 वर्षात भाजप सरकारने मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवारवर काम केलं, पण या सर्व योजना थेट लोकांपर्यंत पोहचलीच नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ते अमरावती येथे आयोजित परिसंवाद कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. रोहित पवार म्हणाले कि, ज्या पद्धतीने ती योजना वापरायला पाहिजे ती वापरण्यात आली नाही. मागेल त्याला शेततळे दिले 50 हजारात, काही जणांना ती पुरलं पण नाही, जिथं शेततळे दिलं तिथं पाणी टाकायला जर त्याला अस्थरीकरन (प्लाष्टीक) लागते आणि त्यासाठी त्यांना लाईनमध्ये उभं राहावं लागले. फक्त आकडे वाढवण्यासाठी हे केलं पण त्या शेततळ्यात पाणी टाकल्यावर त्यामध्ये पाणी कुठं राहते, अशी टीका रोहित पवारनी भाजपवर केली.
- Advertisement -