Home शहरे बीड माजलगाव येथील महात्मा फुले विद्यालयाचे शिक्षक सुमंत गायकवाड सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित

माजलगाव येथील महात्मा फुले विद्यालयाचे शिक्षक सुमंत गायकवाड सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित

0

माजलगांव : प्रतिनिधी येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालयाचे विभागप्रमुख सुमंत गायकवाड यांना सत्यशोधक पुरस्काराने कॅबीनेट मंत्री जयदत्त क्षिरसागर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
बीड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाउ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमीत्त नुकताच पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये श्री. गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. सत्यशोधक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक थोरात दरवर्षी प्रतिष्ठाणच्या वतीने सामाजिक कार्याची दखल घेउन विवीध क्षेत्रातील काम करणा-या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. श्री. गायकवाड हे नुकतेच रशिया मास्को येथील आंतरराष्ट्ीय परिषदेत साहित्यरत्न आण्णाभाउ साठे यांच्या साहित्यातील मानवातावाद या विषयावर झालेल्या परिषदेला गेले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेत यावर्षी चा सत्यशोधक पुरस्कार सुमंत गायकवाड यांना कॅबीनेट मंत्री जयदत्त क्षिरसागर यांच्या हस्ते देउन गौरविण्यात आले. यावेळी विलास बडगे, दिनकर कदम, अरूण डाके, नितीन धांडे, गणेश वाघमारे, रविंद्र कदम, उत्तम हजारे, सत्यशोधक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष दिपक थोरात, कपिल सोनवणे, बी. एस. कांबळे, धिरज अलझेंडे, राजेश घोडगे व प्रतिष्ठाणचे पदाधिकारी उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्र परिवार व नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे.