माजी नगरसेविकेला पुराचा फटका

- Advertisement -

पुणे : महापालिकेच्या रिपाइंच्या माजी नगरसेविका शोभा सावंत यांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे सावंत या गेल्या तीन दिवसापासून महापालिकेच्या शाळेत आश्रयाला आहेत.

तीन दिवसांपूर्वी विश्रांतवाडी मधील शांतीनगर येथे पुराचे पाणी घुसले होते. त्यात सावंत यांच्या घरातही पाणी घुसले होते. त्यामुळे त्यांच्या घरातील सर्व साहित्य वाहून गेले आहे. सावंत या नानासाहेब परुळेकर शाळेत आश्रयाला असून महापालिकेकडून पूरग्रस्तांना मिळत नसलेल्या मदतीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, महापालिका पुरग्रस्तांना मदत करण्यात आखडता हात घेत असून पालिकेने केवळ निवाऱ्याची सोय केली आहे. तर इतर सर्व सुविधा स्वयंसेवी संस्था देत आहेत. त्यामुळे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनीही या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.


- Advertisement -