Home बातम्या राजकारण माझा फोन टॅप होतोय : ममता

माझा फोन टॅप होतोय : ममता

0

कोलकाता : माझा फोन टॅप होत असून त्याचा पुरावा माझ्यापाशी आहे, असा खळबळजनक आरोप पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केला.

राज्य मंत्रालायात पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, माझा फोन टॅप होत आहे. मला हे माहित आहे. कारण मला ही माहिती मिळाली आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. हा प्रश्‍न तुम्ही केंद्र सरकारकडे नेणार का? असे विचारता ते म्हणाले, काय तेथे न्यायचे? सरकारला ते माहित आहे. सरकारच ते करत आहे. व्हॉट्‌स ऍपच्या माध्यमातून होणाऱ्या हेरगिरीबाबतच्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. हा आरोप त्यांनी यापुर्वीही केला आहे.

फेब्रुवारी महिन्यात पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी हा आरोप प्रथम केला होता. माझ्याकडे गुप्तवार्ता विभागाचा अहवाल आहे. त्यानुसार माझा माझा फोन नेहमी टॅप होतो, असे त्या म्हणाल्या होत्या.