हायलाइट्स:
- मसाबाला नव्हत्या माहीत तिच्या जन्माच्या वेळी घडलेल्या घटना
- नीना यांच्या पुस्तकातून मसाबाला समजलं सत्य
- आईला आनंद देण्यासाठी मेहनत करणार असल्याचं मसाबाचा निर्धार
अमिताभ बच्चनपेक्षा जितेंद्र सरस; रीना रॉय यांचं वक्तव्य ऐकून सर्वजण थक्क
मसाबाने आयोजित केलेल्या सेशनमध्ये युझरने विचारलं, ‘नीना यांच्या पुस्तकातील अशी कोणती गोष्ट आहे जी पुस्तकात तर आहे परंतु, तुम्हाला त्याबद्दल माहीत नव्हतं?’ युझरच्या या प्रश्नावर उत्तर देताना मसाबाने लिहिलं, ‘मला माहित नव्हतं की माझ्या जन्माच्या वेळेस आईकडे पैसे नव्हते. मी एक सी-सेक्शन मुलगी आहे. हे हृदय पिळवटून टाकणारं आहे.’ मसाबाने नीना यांच्या पुस्तकातील काही ओळी शेअर करत लिहिलं, ‘जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा आईकडे बँकेत फक्त दोन हजार रुपये होते. तेव्हा सी-सेक्शनने बाळाला जन्म द्यायला जवळपास १२ हजार रुपयांचा खर्च यायचा.’
नीना यांची प्रेरणा घेत मसाबाने लिहिलं, ‘मी आईचं पुस्तक वाचलं आणि त्यातून खूप काही शिकले. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी खूप मेहनत करते. त्याचं कारण म्हणजे माझी आई. मला तिने अनेक संकटांचा सामना करून या जगात आणलं. त्यामुळे मला तिला खूप खूप आनंद द्यायचा आहे.’ नीना यांनी त्यांच्या पुस्तकात मसाबाच्या जन्माच्या वेळच्या घटना लिहिल्या आहेत. मसाबा ही वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू विव रिचर्ड्स यांची मुलगी आहे. अभिनेते सतीश कौशिक यांनी नीना यांना गरोदर असताना त्यांच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव देखील दिला होता.
हिंदी मालिकेच्या सेटवर ‘या’ मराठी अभिनेत्रीवर करण्यात आला होता चोरीचा आरोप