हायलाइट्स:
- अंशुमन विचारेच्या मुलीचा व्हिडिओ होतोय व्हायरल
- चिमुरड्या लेकीने दिली थेट अंशुमनलाच तंबी
- लेकीने दिलेला दम ऐकून अंशमुनचीही झाली पंचाईत
काय म्हणते अन्वी
अंशुमनने त्याच्या सोशल मीडियावर अन्वीचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अन्वीने थेट तिच्या बाबांना दम दिला आहे. या व्हिडिओमध्ये अन्वी तिच्या बाबांनासोबत पहुडलेली आहे. अन्वी मुसमुसत तिच्या बाबांना कुणाला तरी फोन लावायला सांगते आहे, त्यावर अन्वीची आई तिला विचारते, ‘ तू काय बोलणार तिच्याशी फोनवर?’ त्यावर अन्वी म्हणते, ‘मी तिला सांगणार परत जर तिनं माझ्या बाबासोबत डान्स केला तर मी बघ.. बरोब्बर मी तिला धुवून टाकीन. ‘ त्यावर तिची आई तिला म्हणते, ‘का गं असं? आपला बाबा तर अभिनेता आहे ना? ‘ त्यावर अन्वी तिला म्हणते ‘ नाही मला ती आजिबात आवडत नाही.’ असे म्हणून ती रुसते आणि रडू लागते. त्यावर अंशुमन तिला म्हणतो, ‘बरं बाई मी तिला सांगतो की मी आता तुझ्यासोबत डान्स करणार नाही.. मग तर झालं…’ त्यावर अन्वी म्हणते, ‘तू नको सांगूस मीच सांगणार तिला.. की तू परत जर माझ्या बाबासोबत डान्स केला तर बघच.. मी तुला धुवून टाकेन.तिची चांगलीच धुलाई करेन…’ ‘धुलाई करणार म्हणजे काय करणार तू’ असे अंशुमनने तिला विचारले. त्यावर अन्वी म्हणाली, ‘ तिने जर परत तु्झ्याबरोबर डान्स केला ना तर मी तिच्या तोंडावरच पाणी टाकीन..’ त्यावर अंशुमन तिला आणखी चिडवतो… मग चिडून अन्वी म्हणते मग मी तिच्या घरीच जाऊन तिची धुलाई करते.’
अंशुमनने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर त्याचे चाहते भरभरून कॉमेन्ट करत आहेत. तसेच अन्वीचे त्याच्यावर असलेल्या निरागस प्रेमाचेही कौतुक करत आहेत.