“माझ बँड कोणीही वाजवू शकणार नाही. माझा बँड मीच वाजवणार” हे लक्षात ठेवा, असा मा.खासदार उदयनराजे भोसलेचा राष्ट्रवादीला इशारा
भूषण गरुड :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवार संध्याकाळी साताऱ्यात आली. माजी खासदार आणि ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला ते उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेचं स्वागत केलं. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत उदयराजे भोसले यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.
गेल्या 15 वर्षात आघाडी सरकारने माझं एकही काम केलं नाही. सगळे प्रस्ताव अडवून ठेवले. माझ्या प्रत्येक गोष्टींवर त्यांनी फुलीच मारली. मात्र गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी अनेक कामं मार्गी लावली असं सांगत त्यांनी राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, नैतिकता म्हणून मी खासदारकीचा राजीनामा दिला. आता नव्याने मतदारांचा कौल घेणार. राष्ट्रवादी माझा बँड वाजविण्याचा विचार करत असेल तर मी आत्ताच सांगून ठेवतो. माझ बँड कोणीही वाजवू शकणार नाही. माझा बँड मीच वाजवणार हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी राष्ट्रवादीला दिला.