Home पोलीस घडामोडी माणगांव पोलीस ठाणे येथे महिलांनसाठी स्वंतत्र हिरकणी कक्ष व समुपदेशनासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन

माणगांव पोलीस ठाणे येथे महिलांनसाठी स्वंतत्र हिरकणी कक्ष व समुपदेशनासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन

मुंबई:शफीक शेख
माणगाव पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यास आलेल्या महिलांना स्वंतत्र हिरकणी कक्ष तसेच त्यांचे समुपदेशनासाठी स्वतंत्र कक्ष स्थापनेबाबत मा. श्री अनिल पारसकर सो, पोलीस अधीक्षक, रायगड (अलीबाग) यांनी दिलेल्या आदेशानुसार माणगांव पोलीस ठाणे येथे उपविभागीय पोलिस अधिकारी माणगाव श्री. शशीकरण काशीद यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगवले यांच्या पुढाकाराने दिनांक २९/०७/२०१९ रोजी माणगांव पोलीस ठाणे येथे स्वंतत्र महिला कक्ष सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमा अंतर्गत महिला व बालकांवर होणारे अत्याचार या संदर्भात कारवाई करिता सदर कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महिलांनी माणगाव पोलीस ठाणे येथे आल्यावर आपल्या अडचणींविषयी महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीमती. बुरुंगळे यांचे संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक इंगवले यांनी केले आहे. कार्यक्रमास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. काशीद, मा. तहसीलदार श्रीमती. प्रियांका अहिरे, माणगाव नगराध्यक्षा श्रीमती. योगिता चव्हाण, महिला दक्षता समितीच्या सदस्या मिरजकर, शिंदे तसेच माणगाव पोलीस ठाणे महिला कर्मचारी उपस्थित होत्या.