Home ताज्या बातम्या माणगांव मध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून EVM च्या भांडाफोड परिवर्तन यात्रेत अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत EVM ची पोल खोल

माणगांव मध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून EVM च्या भांडाफोड परिवर्तन यात्रेत अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत EVM ची पोल खोल

0

बोरघर / माणगाव : ( विश्वास गायकवाड ) भारत निवडणूक आयोग निर्मीत देशातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शक आणि विश्वासार्ह समजल्या जाणाऱ्या पूर्वापार चालत आलेल्या मतपत्रिके वरील अर्थात बॅलेट पेपर मतदान पद्धतीला काही धूर्त कावेबाज राजकीय मंडळींनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी कालबाह्य ठरवून भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून प्रचलित बॅलेट पेपर व्होटिंग सिस्टीमला हेतुपुरस्सर फाटा देऊन किंबहुना कालबाह्य ठरवून EVM मशीनचा संपूर्ण देशातील मतदान प्रक्रियेत अंतर्भाव केला असून सदर EVM मशीन मध्ये सत्ताधारी पक्षाच्या एक्सपर्ट तंत्रज्ञांनी तांत्रिक छेडछाड करून आपले राजकीय ईप्सित साध्य केले. त्यामुळेच त्यांनी सत्ता हस्तगत करुन ते भारतातील संविधानिक लोकशाही नष्ट करून देशात पुन्हा प्राचीन मनुस्मृती लागू करण्याचा त्यांचा मानस आहे. असा समस्त विरोधी पक्षनेते आणि भारतीय संविधानिक लोकशाहीवर प्रचंड निष्ठा असलेल्या तमाम हितचिंतकांचे ठाम मत आहे.
देशाची अखंडता कायम अबाधित ठेवणाऱ्या भारतीय संविधान निर्मीत लोकशाहीचे अस्तित्व कायम अबाधित ठेवण्यासाठी आणि या संविधानिक लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने EVM मशीनच्या माध्यमातून भारतीय संविधानासह लोकशाहीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि EVM मशीनच्या राजकीय भ्रष्टाचाराची समस्त भारतातील जनतेसमोर पोल खोल तथा भांडाफोड करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक बहुजन मूलनिवासी नायक माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर EVM भांडाफोड परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात गुरवार दिनांक २२ आँगस्ट २०१९ रोजी दुपारी ४.३० वाजता कुणबी भवन निजामपूर रोड माणगांव येथे EVM ची भांडाफोड परिवर्तन सभा आयोजित केली असून या भव्य सभेत अनेक दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत EVM मशीनच्या भ्रष्टाचाराचा पोल खोल आणि वस्त्रहरण केले जाणार आहे. त्या नंतर  संध्याकाळी ६.०० वाजता लोणेरे व ७.०० वाजता महाड येथे स्वागत या यात्रेच्या रॅलीचे जंगी स्वागत होणार आहे.
बहुजन क्रांती मोर्चा तर्फे राष्ट्रव्यापी काश्मीर ते कन्याकुमारी अशी ही EVM भांडाफोड परिवर्तन याञा दि.२६ जून पासून १८० दिवस सतरा राज्यात१८० लोकसभा मतदार क्षेत्रात चालूअसून या यात्रेचे नेतृत्व बहुजन मूलनिवासी नायक माननीय वामन मेश्राम (राष्ट्रीय संयोजक बहुजन क्रांती मोर्चा नवी दिल्ली)हे करीत आहेत.
गुरुवार दिनांक २२आॅगस्ट रोजी माणगांव तालुक्यात होत असलेल्या सदर EVM भांडाफोड यात्रेच्या सभेच्या कार्यक्रमाचे उदघाटक माननीय प्रमोद घोसालकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड हे आहेत. या भांडाफोड सभेला प्रमुखअतिथी म्हणून व्ही.एल.मातंग राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी नवी दिल्ली, हजरत मौलाना अब्दुल हमीद अजहरी राष्ट्रीय अध्यक्ष मुस्लिम मूळ निवासी मोर्चा नवी दिल्ली, तर विशेष अतिथी म्हणून एच. एन. रेकवाल राष्ट्रीय अध्यक्ष आदिवासी एकता परिषद नवी दिल्ली, बीपश प्रदीप कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष ख्रिश्चन नवी दिल्ली, निशा मेश्राम राष्ट्रीय महिला प्रभारी बहुजन क्रांती मोर्चा, सिमरनजीत मान अध्यक्ष शिरोमणी अकाली दल अमृतसर, विकास चौधरी पटेल राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा नवी दिल्ली, कोरनेश्वर स्वामी राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय लिंगायत मोर्चा नवी दिल्ली, मनोज कुमार राष्ट्रीय प्रभारी मूलनिवासी अत्यंत पिछडी अनुसूचित जाती जागृती मोर्चा नवी दिल्ली विशेष अतिथी महादेव दिवेकर माजी सभापती कृषी व पशुसंवर्धन विद्यमान सदस्य रा. जि. प. रायगड, जितेंद्र पाटील जि. अध्यक्ष महा नवनिर्माण सेना रायगड, प्रभाकरदादा उभारे महाराष्ट्र सचिव राष्ट्रवादी काँग्रेस, महादेव बक्कम अध्यक्ष कुणबी समाज माणगांव, रफिक लम्बाडे जेष्ठ सामाजिक विचारवंत, देवेंद्र गायकवाड अध्यक्ष दक्षिण रायगड मनसे, सलीम उके संयोजक बहुजन क्रांती मोर्चा रायगड, पांडुरंग जाधव माजी नगरसेवक पेण, सिद्धार्थ मोरे रायगड जिल्हा प्रभारी बसपा, नामदेव रेशीम सामाजिक कार्यकर्ते, मुसद्दीक इनामदार उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, करण गायकवाड नगरसेवक म्हसळा, निलेश थोरे युवा नेते शेकाप प्रमुख वक्ते दादासाहेब पनवेलकर रा. प्रभारी रा. मु. साधुसंत संघ, विजय आवास्कर अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा, एन. बी. हाटे संयोजक बहुजन क्रांती मोर्चा, ऍड. उत्तम जाधव सामाजिक कार्यकर्ते, रवींद्र मोरे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, टी. एस. देशमुख अध्यक्ष किसान क्रांती संघटना, रमेश गुजर निवृत्ती बिडिओ, ऍड. रोशन पांढरे कायदेविषयक सल्लागार, ऍड. मंगेश हुमणे बहुजन मुक्ती पार्टी, विकास दादा गायकवाड अध्यक्ष बौद्ध जन पंचायत सेवा संघ इत्यादी मान्यवर मंडळी आणि रायगड मधील प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसागर उपस्थित राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तमाम जनतेला या कार्यक्रमाची उत्कंठा लागून राहिली आहे. बहुजन क्रांती मोर्चा आयोजित सदर EVM भांडाफोड परिवर्तन यात्रा ऐतिहासिक ठरणार आहे अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.