Home मनोरंजन माय लेकींनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; सारा-अमृताचा ‘तो’ फोटो व्हायरल

माय लेकींनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; सारा-अमृताचा ‘तो’ फोटो व्हायरल

0
माय लेकींनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम;  सारा-अमृताचा ‘तो’ फोटो  व्हायरल

[ad_1]

हायलाइट्स:

  • सारा आणि अमृता करणार एकत्र काम?
  • साराने सोशल मीडियावर शेअर केले फोटो
  • साराच्या चाहत्यांची इच्छा होणार पूर्ण

मुंबई : सारा अली खानने ‘केदारनाथ’ सिनेमातून चित्रपट विश्वामध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासूनच तिच्या चाहत्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणजे साराने तिच्या आईसोबत अथवा वडिलांसोबत काम करताना त्यांना बघायचे आहे. आता लवकरच साराच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये ती आपल्या आईसोबत म्हणजे अमृता सिंह सोबत दिसत आहे. या दोघींचा फोटो हा त्यांच्या ख-या आयुष्यातील नाही तर एका जाहिरातीमधील आहे. या फोटोमध्ये अमृता सिंह यांनी निळ्या रंगाचा सलवार-कुर्ता परिधान केला आहे तर साराने पांढ-या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे. या फोटोमध्ये अमृता साराच्या केसांना तेल लावताना दिसत आहेत. त्यामुळे या दोघींनी केसांना लावणा-या तेलाच्या जाहिरातीमध्ये काम केले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, सारा अली खानने याआधी ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला आईसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. इतकेच नाही तर माझ्यासोबत काम करण्याचा अनुभव आईसाठी कदाचित वाईट असू शकतो, असेही तिने गंमतीमध्ये सांगितले होते.

साराच्या कामाबाबत सांगायचे तर तिने अलिकडेच ‘सिंबा’ या सुपरहिट सिनेमामध्ये काम केले होते. त्या सिनेमामध्ये रणवीर सिंह तिच्यासोबत होता. आता लवकरच ती आनंद एल राय दिग्दर्शित ‘अतरंगी रे’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अक्षयकुमार , धनुष हे देखील दिसणार आहेत. याशिवाय आदित्य धर दिग्दर्शित करत असलेल्या ‘ द इमॉर्टल अश्वत्थामा’ या सिनेमात ती विकी कौशलबरोबर दिसणार आहे.

[ad_2]

Source link