Home गुन्हा मार्केटयार्ड मध्ये घरफोडी 14 लाख 40 हजाराचा ऐवज लंपास

मार्केटयार्ड मध्ये घरफोडी 14 लाख 40 हजाराचा ऐवज लंपास

0

घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 14 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना धवलगिरी सोसायटी, बिबवेवाडी-कोंढवा रोड, मार्केट यार्ड, पुणे येथे घडली.

अमित भालचंद्र कर्डिले (वय 40, राहणार. धवलगिरी सोसायटी, बिबवेवाडी-कोंढवा रोड, मार्केटयार्ड, पुणे) यांनी याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित कर्डिले शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2019 रोजी नोकरीनिमित्त फ्लॅटचे लाँक बंद करून घराबाहेर गेले होते. दुपारी 12 ते 12:45 सुमारास अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचे लाँक कशाचातरी साह्याने उचकटून घरात प्रवेश करत शयनगृहातील लाकडी कपाटामधील 39 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 75 हजार रुपयांची रोकड असा एकूण 14 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला.

सदर घटनास्थळी पोलीस आयुक्त परिमंडळ 5 पुणे शहर सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर सुनील कलगुटकर, गुन्हे शाखा युनिट 5 पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर यांनी भेट देत यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेप्रमाणे मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.ए.खटके, पोलीस उपनिरिक्षक सागर पाटील सदर घटनेचा पुढील तपास करत आहे.