Home ताज्या बातम्या मार्क झुकरबर्ग:जिओ आणि फेसबुकची भागीदारी भारतातील तरुण व्यावसायिकांसाठी वरदान ठरणार

मार्क झुकरबर्ग:जिओ आणि फेसबुकची भागीदारी भारतातील तरुण व्यावसायिकांसाठी वरदान ठरणार

0

नवी दिल्ली : फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांनी भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनी Reliance Jioमध्ये भागीदारी घेतली आहे. तर ही भागीदारी घेतल्यानंतर झुकरबर्ग यांनी भारतात आर्थिक गुंतवणूक करून तरुणांसाठी व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे.

मार्क झुकरबर्ग यांनी या jiO सोबत केलेल्या भागीदारीबाबत आनंद व्यक्त केला. तसेच मार्क म्हणाले की, “सध्या जगात बरेच काही सुरू आहे. पण मला माझ्या भारतातील कामाविषयी काहीतरी सांगायचे आहे. फेसबुक Jio Platformsसोबत काम करत आहे. आम्ही एक आर्थिक गुंतवणूक करीत आहोत आणि त्याहीपेक्षा आम्ही काही मोठ्या प्रकल्पांवर एकत्र काम करण्यासाठी सज्ज आहोत. यामुळे संपूर्ण भारतातील लोकांना नवीन व्यवसाय संधी देईल.

फेसबुकने जिओमध्ये 43 हजार 574 कोटींची गुंतवणूक करत 9.99 टक्के भागीदारी खरेदी केला आहे. तर 2016मध्ये रिलायन्स कंपनीने टेलिकॉम क्षेत्रात जिओ आणलं. जिओनं 4 वर्षांमध्ये टेलिकॉम क्षेत्रात आपलं वचर्स्व निर्माण केलं आहे. रिलान्सने टेलिकॉम ते होम ब्रॉडबॅण्डपर्यंत आपल्या सेवा विस्तारीत केल्या आहेत.

याबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले की, “दीर्घकालीन भागीदार म्हणून फेसबुकचे स्वागत करण्यात मला आनंद होत आहे. हा करार भारताला जगातील आघाडीच्या डिजिटल देशांपैकी एक बनविण्यासाठी फायद्याचा आहे. मार्क झुकरबर्ग आणि माझ्यासाठी डिजिटल परिवर्तन आणि सर्व भारतीयांची सेवा करणे हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे.

फेसबुक आणि व्हॉट्स अॅपचा वापर भारतातील बर्‍याच भागात केला जातो. तसेच, सध्या भारत मोठ्या डिजिटल परिवर्तनातून जात आहे. त्यामुळे या भागीदारीचा नक्कीच फायदा तरुणांना होईल. झुकरबर्ग म्हणाले की, “लघु उद्योग प्रत्येक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असतात आणि त्यांना मदतीची आवश्यकता असते. भारतात 6 कोटींहून अधिक लघु उद्योग आहेत आणि कोट्यावधी लोक नोकरीसाठी त्यांच्यावर अवलंबून आहेत.