Home शहरे अकोला मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट

0
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट

मुंबई, दि. 3 : मालदीव प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांनी आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट दिली. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष एस एस मुंद्रा आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बोर्ड मेंबर्स समवेत राष्ट्राध्यक्ष श्री.सोलिह यांनी चहापान घेतल्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज स्थित नेटवर्क ऑपरेशन सेंटर (NOC) आणि सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरची (SOC) पाहणी केली. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील इंटरनॅशनल कॉन्व्हेंशन हॉलमध्ये येऊन प्रातिनिधिक स्वरुपात घंटा वाजविली.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बोर्डच्यावतीने ‘द बिग बुल’ या कांस्य शिल्पाचे स्मृतिचिन्ह आणि ‘बी एस ई- टेंपल ऑफ वेल्थ क्रिएशन’ हे कॉफी टेबल बुक श्री.सोलीह यांना भेट देण्यात आले.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) हे भारतातील पहिले आणि सर्वात मोठे सिक्युरिटीज मार्केट आहे आणि 1875 मध्ये नेटीव्ह शेअर आणि स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन म्हणून त्याची स्थापना करण्यात आली. आज जगातील सर्वात मोठ्या एक्सचेंजपैकी एक म्हणून त्याची गणना होते. या ठिकाणाला भेट देण्यासाठी मालदीव प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष श्री. सोलिह आले होते, अशी माहिती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष श्री. मुंद्रा यांनी दिली.

***

विसअ/अर्चना शंभरकर/विसंअ/3.8.2022