मास्क न लावता फिरणाऱ्या कंगानाला पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर, म्हणाले; ‘हिला अटक करा’

मास्क न लावता फिरणाऱ्या कंगानाला पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर, म्हणाले; ‘हिला अटक करा’
- Advertisement -


हायलाइट्स:

  • कंगना रणौतचा मुंबई भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
  • मुंबईतील ऑफिसची पाहाणी करताना मास्क न वापरणाऱ्या कंगनावर भडकले नेटकरी
  • सोशल मीडियावरून होतेय कंगनाच्या बेजबाबदार वागण्यावर टीका

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नुकतीच तिच्या ऑफिसची पाहणी करण्यासाठी मुंबईमध्ये पोहोचली होती. मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईनंतर आता कंगनाच्या ऑफिसचं रिनोव्हेशन केलं जात आहे. हे ऑफिस अवैध असल्याचं सांगत बीएमसीनं ते तोडलं होतं. पण आता जेव्हा या ऑफिसमध्ये सुरू असलेल्या कामाची पाहाणी करण्यासाठी कंगना या ठिकाणी पोहोचली तेव्हा तिनं मास्क लावला नव्हता. करोनाच्या भयंकर परिस्थितीत कंगनाचं असं बेजबाबदार वागणं युझर्सना अजिबात आवडलं नाही आणि त्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Video: ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान…’ असं म्हणत नेटकऱ्यांनी कंगना रणौतलाच विचारला जाब
कंगनानं सोमवारी पाली हिलमधील तिच्या ऑफिसमध्ये हजेरी लावत तिथल्या कामाची माहिती घेतली. ऑफिसमध्ये सुरू असलेल्या कामाची पाहाणी करत असतानाचा कंगनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये कंगनानं कुठेही फिरताना मास्क लावलेला दिसत नव्हता. त्यामुळे आता तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होताना दिसत आहे.


मुंबईमध्ये करोनाची भयंकर परिस्थिती असतानाही कंगनानं मास्क लावलेला नाही हे पाहून एका युझरनं कमेंट करताना लिहिलं, ‘हिला अटक करा, ही मास्क न लावताच सगळीकडे फिरत आहे.’ तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, ‘ही मास्क का वापरत नाही, हिला सनग्लासेस वापरणं लक्षात राहतं पण मास्क लावायला लक्षात राहत नाही का?’ तसेच अन्य एका युझरनं कमेंट करताना लिहिलं, ‘ही नेहमी मास्क न लावताच का फिरत असते?’ अशाप्रकारे अनेक लोकांनी कंगनाला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.

AssignmentImage-600740454-1623235052

कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं तर ती आगामी काळात ‘थलायवी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात तिनं तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. याशिवाय कंगनाकडे ‘धाकड’ आणि ‘तेजस’ असे दोन चित्रपट आहेत.





Source link

- Advertisement -