Home ताज्या बातम्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालायच्या संकेतस्थळाच्या अद्यावतीकरणाचे काम सुरु असल्याने ही वेबसाईट तात्पुरत्या स्वरुपात बंद

माहिती व जनसंपर्क महासंचालनालायच्या संकेतस्थळाच्या अद्यावतीकरणाचे काम सुरु असल्याने ही वेबसाईट तात्पुरत्या स्वरुपात बंद

0

  मुंबई, दि. 19 : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालायच्या संकेतस्थळावर जुना डेटा दिसत असल्याबद्दल  समाज माध्यमांवर अनावश्यक मल्लिनाथी केल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे काही तांत्रिक चूक होऊ शकते अशी शंकाही उपस्थित न करता वा माहिती न घेता वेबसाईट बदललेलीच नाही, असे भासवले जात आहे, हे गैर असल्याचे महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे. 

            यासंदर्भात महासंचालनालयाने दिलेलेया प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत  या वेबसाईटची देखभाल केली जाते. या वेबसाईटवर आयटी विभागाच्या स्टेट डेटा सेंटर येथे अपडेशनचे काम काल सकाळपासून सुरू आहे. यात जुना सर्व डेटा अन्यत्र सुरक्षित हस्तांतरित करण्यात येत आहे. ते करीत असताना काही वेळाकरिता जुना डेटा दिसला. या वेबसाईटवर सातत्याने नवनवीन माहिती अपडेट केली जाते. सध्याच्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर  वेबसाईटवर लगेच बदल करण्यात आले. असंख्य वृत्तपत्रकार, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी या वेबसाईटचा नेहमी उपयोग करीत असतात. संकेतस्थळाच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना झालेल्या तांत्रिक चुकीचा आधार घेऊन वेबसाईटवर जणू डिसेंबरपासून जुनीच माहिती दिसत आहे असा गैरसमज समाज माध्यमांवर करून देणे अनुचित आहे. सध्या बंद ठेवलेली ही वेबसाईट तांत्रिक दोष दूर केल्यानंतर पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती महासंचालनालयाने प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.