Home बातम्या ऐतिहासिक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या प्रदर्शनाचे नागरिकांकडून कौतुक

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या प्रदर्शनाचे नागरिकांकडून कौतुक

0
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या प्रदर्शनाचे नागरिकांकडून कौतुक

मुंबई, दि.3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने मुंबई येथील जुहू समुद्रकिनारी आयोजित केलेल्या शासनाच्या विविध योजना व विकासकामांवर आधारित सचित्र प्रदर्शनास आज अनेक नागरिकांनी भेट दिली. महाविकास आघाडी सरकारच्या योजना सामान्यांचा आधारवड आहेत, नागरिकांना आत्मनिर्भर होण्यासाठी या योजना महत्त्वपूर्ण ठरतील, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी यावेळी दिल्या.

या प्रदर्शनाला सर्वच घटकातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. आज अनेक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन शासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. शासनाने राबविलेल्या योजनांची माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण असून या योजनांचा लाभ आम्ही घेऊ, आमच्या संपर्कातील प्रत्येकाला याबाबत माहिती देऊ, असेही नागरिकांनी सांगितले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या विविध योजना व विकासकामांवर आधारित चित्र प्रदर्शन 5 मे पर्यंत  सकाळी 10 ते सायं. 7 पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.